Sonalee Kulkarni : अप्सराला बाप्पा कसा पावला? सोनाली कुलकर्णी रमली गणेशोत्सवाच्या आठवणीत
Kalavantacha Ganesh : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या (Sonalee Kulkarni) करिअरची सुरुवात गणेशोत्सवापासून झालेली आहे.
Sonalee Kulkarni On Kalavantancha Ganesh : केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित 'बकुळा नामदेव घोटाळे' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणाऱ्या सोनाली कुलकर्णीचं (Sonalee Kulkarni) आणि बाप्पाचं (Ganeshotsav 2023) खास नातं आहे. मुळात अभिनेत्रीच्या करिअरची सुरुवातच गणेशोत्सवापासून झालेली आहे. कलेचं दैवत असणारा बाप्पा सोनाली कुलकर्णीसाठी लकी ठरला आहे.
एबीपी माझाशी बाप्पाबद्दल बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली,"बाप्पा आणि माझं अत्यंत स्पेशल आणि घट्ट नातं आहे. एक कलाकार म्हणून माझ्या आयुष्यात बाप्पाचं महत्त्व वेगळं आहे. बाप्पाला आपण कलेचं दैवत असं म्हणतो. माझ्या कारकिर्दीची सुरुवात नकळतपणे गणेशोत्सवापासून झाली आहे. त्यावेळी या क्षेत्रात यायचं की नाही हे माझं ठरलेलंही नव्हतं. अगदी सात-आठ वर्षांची असल्यापासून मी गणेशोत्सवातील सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे आणि तिथूनच माझ्यातला कलाकार बाप्पाच्या चरणी घडला आहे".
सोनाली पुढे म्हणाली,"कलाकार म्हणून असलेली जडणघडण गणेशोत्सवात झाली आहे. एकंदरीत सार्वजनिक गणेशोत्सवामुळे माझ्यातला कलाकार घडला आहे. नृत्य कला आणि अभिनय कलेची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने झाली आहे. बाप्पाचा आशीर्वाद कायमच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या घरी दहा दिवसांचा बाप्पा येत आहे. घरी कायमच भक्तीमय वातावरण राहिलं आहे".
आजही 'ते' दिवस आठवतात : सोनाली कुलकर्णी
बाप्पाच्या आठवणीत रमलेली सोनाली कुलकर्णी म्हणाली,"आरत्या, रांगोळी, नैवेद्य, बाप्पाची आरास सजवणं या सर्व गोष्टींमध्ये एक वेगळीच गंमत होती. गेल्या पाच वर्षांपासून मी आणि माझा भाऊ घरीच बाप्पाची मूर्ती बनवत आहोत. यंदाचा गणेशोत्सव स्पेशल असणार आहे. संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा बाप्पाच्या रुपात बनवली आहे".
मंचावर पाऊल ठेवताना वाटतं बाप्पा माझ्या पाठीशी : सोनाली कुलकर्णी
सोनाली कुलकर्णी म्हणते,"मंचावर पाऊल ठेवताना नेहमीचं असं वाटतं की, बाप्पा माझ्या पाठीशी आहे. कोणतीही कला सादर करताना बाप्पाची शक्ती नेहमीच सोबत असते. कुटुंबीय एकत्र येऊन जेव्हा आरत्या म्हणायचो, मोदक बनवायचो, सजावट करायचो त्या सर्व गोष्टींची आज आठवण येते. त्यावेळी आम्हा भावंडांमध्ये आरत्यांची स्पर्धा असायची. या सर्व गोष्टी आज आठवतात".
सोनाली कुलकर्णी पुढे म्हणाली,"बाप्पाच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत. मूर्ती सजलेली आहे. आता सजावट साधं करण्यावर आमचा भर आहे. गणेशोत्सव हा माझा अत्यंत लाडका आणि आवडीचा सण आहे. गणेशोत्सवात डाएटकडे दुर्लक्ष करत हा सण साजरा करण्यावर माझा भर असतो".
संबंधित बातम्या