Gadar 3 : 'गदर 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; दिग्दर्शक म्हणाले,"सब्र का फल मीठा होता हैं"
Gadar 2 : बॉक्स ऑफिसवर 'गदर 2' हा सिनेमा धुमाकूळ घालत असून लवकरच 'गदर 3' (Gadar 3) सिनेमा प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
Gadar 3 : अनिल शर्मा (Anil Sharma) दिग्दर्शित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Ameesha Patel), सिमरत कौर आणि मनीष वाधवा मुख्य भूमिकेत आहेत. 'गदर:एक प्रेम कथा' आणि 'गदर 2'च्या यशानंतर निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी 'गदर 3'च्या (Gadar 3) तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच 'गदर 3' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'गदर 2'च्या शेवटी 'जारी रहेगा' असं लिहिलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांची सिनेमाच्या तिसऱ्या भागासंदर्भात उत्सुकता वाढली आहे. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत 'गदर'चे दिग्दर्शक अनिल शर्मा (Anil Sharma) म्हणाले की,"गदर 3'साठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. प्रतीक्षा केल्याचं फळ त्यांना नक्कीच मिळेल. सब्र का फल मीठा होता हैं... 'गदर' आणि 'गदर 2'प्रमाणे 'गदर 3'देखील नक्कीच चांगली कलाकृती असेल...फक्त थोडी वाट पाहा".
'गदर : एक प्रेम कथा' (Gadar) हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सनी देओल (Sunny Deol), अमिषा पटेल (Ameesha Patel) आणि उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) मुख्य भूमिकेत आहेत. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात 'गदर 2'प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर' या सिनेमात तारा सिंह आणि सकिनाची प्रेमकहानी पाहायला मिळाली होती. तर 'गदर 3'मध्ये त्यांच्या मुलाला केंद्रीत करण्यात आले आहे.
बजेट 80 कोटी अन् कमाई
'गदर 2' या सिनेमाने निर्मिती 80 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी 'गदर 2' या सिनेमाने 40 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 43.08 कोटी, तिसऱ्या दिवशी 51.7 कोटी, चौथ्या दिवशी 38.7 कोटींची कमाई केली आहे. तर रिलीजच्या पाचव्या दिवशी अर्थात स्वातंत्र्य दिनी तब्बल 55.5 कोटींची दणदणीत कमाई केली आहे. तर आतापर्यंत या सिनेमाने 229.08 कोटींचा गल्ला जमवला आहे.
- पहिला दिवस : 40 कोटी
- दुसरा दिवस : 43.08 कोटी
- तिसरा दिवस : 51.7 कोटी
- चौथा दिवस : 38.7 कोटी
- पाचवा दिवस : 55.5 कोटी
- एकूण कमाई : 229.08 कोटी
'गदर 2' हा सिनेमा पारियड अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. अनिल शर्मा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली आहे. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल बोलताना उत्कर्ष शर्मा म्हणाला,"गदर 3' हा सिनेमा जीतेच्या मुलांवर भाष्य करणारा असू शकतो. लेखक सध्या या सिनेमाच्या कथानकावर काम करत आहेत".'गदर 3'मध्येही सेम कास्ट असणार आहे.
संबंधित बातम्या