एक्स्प्लोर

Gadad Andhar Trailer: 'गडद अंधार' चा ट्रेलर झाला रिलीज; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

'गडद अंधार' (Gadad Andhar) चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात जय दुधाणे प्रमुख भूमिका साकारणार आहे.

Gadad Andhar Trailer : पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार' (Gadad Andhar) हा मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाल्यापासूनच सर्वांच्या मनात या चित्रपटाबद्दल कुतूहल आहे. 'गडद अंधार'बाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली असली तरी हा चित्रपट पाहण्यासाठी रसिकांना 3 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. या चित्रपटातील 'दरिया...' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं, या गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. आता या चित्रपटातील म्युझिकसह ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. 'गडद अंधार'च्या ट्रेलरचं सोशल मीडियावर कौतुक होत असून, अल्पावधीतच लाखो व्ह्युजही मिळाले आहेत.

निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद अंधार' या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचा संगीत आणि ट्रेलर प्रकाशन सोहळा संपन्न झाला आहे. या चित्रपट चित्रपटामध्ये अभिषेक खणकरने लिहिलेलं आणि गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतने स्वत:च्या आवाजात संगीतबद्ध केलेलं 'दरिया, दरिया...' या गाण्यासोबतच एक अंगाई गीत आणि एक थीम साँगही आहे. झी म्युझिक मराठीवर रिलीज होणारी ही गाणी दिव्या कुमारसह जुईली जोगळेकर राऊतने गायली आहेत. प्रत्येक गाण्याचं पटकथेत आपलं एक महत्त्व असून, हि गाणी पटकथा गतीमान करण्याचं काम करणारी आहेत. त्या जोडीला 'गडद अंधार'चा ट्रेलरही रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचं बरंचसं चित्रीकरण पाण्याखाली करण्यात आलं आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी असलेलं विश्वही यात पाहायला मिळणार असल्याची झलक ट्रेलरमध्ये दिसते. गाण्यांच्या जोडीला यातील अर्थपूर्ण संवाद मनाला भिडतात. ट्रेलरमधील प्रसंग 'गडद अंधार'बाबतची उत्सुकता आणखी वाढवणारे आहेत. दरिया... या गाण्याची पार्श्वभूमी असलेल्या ट्रेलरमध्ये पाण्याखालच्या गडद अंधारात कोणतं रहस्य दडलं आहे याची झलक दिसते. 

पाहा ट्रेलर: 

गडद अंधार' 3 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार

'या खोल समुद्रात किती आणि कोणत्या प्रकारची रहस्यं दडलीत हे सांगणं तेवढंच कठीण आहे', हा ट्रेलरमधील संवाद चित्रपटातील रहस्य आणखी गडद करणारा आहे. 'गडद अंधार'चं लेखन प्रज्ञेश कदम, लौकिक आणि चेतन मुळे यांनी केलं आहे. 'बिग बॅास' आणि 'एमटीव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स 3' या रिअॅलिटी शोज्च्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेला जय दुधाणे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. अभिनेत्री नेहा महाजन त्याच्या साथीला आहे. याशिवाय शुभांगी तांबळे, आकाश कुंभार, चेतन मुळे, आरती शिंदे, श्री, बालकलाकार अस्था आदी कलाकारांनीही विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. प्रवीण वानखेडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून, गाण्याचे संयोजन आदिनाथ पातकर यांनी केले आहे. सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' 3 फेब्रुवारी 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Gadad Andhar: 'गडद अंधार' मधील 'दरिया, दरिया...' गाणं प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Mumbai Rain Accident : मुंबईत मुसळधार, घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर कोसळला बॅनर ABP MajhaTOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 13 May 2024 : 04 PM : ABP MajhaMumbai Rain : उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; ठाणे,बदलापूर ,कल्याणमध्ये पावसाची बॅटिंगABP Majha Headlines : 04 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Rain : मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
मुंबईत घाटकोपरला पेट्रोल पंपवर बॅनर कोसळला; मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरची वाहतूक बंद
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Match Fixing: चेन्नई-राजस्थान सामना फिक्स होता? मनोज तिवारी आणि वीरेंद्र सहवागकडून गंभीर प्रश्न 
Mumbai Rain : मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
मुंबईत तुफान पाऊस, पार्किंग टॉवर कोसळला, ऐरोलीत हायटेन्शन टॉवर पेटला, तासाभरात हाहाकार!
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
शेअर मार्केटमध्ये कधी येणार तेजी? मंत्री अमित शाह यांनी सांगितली तारीख
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget