Beast ते KGF 2 पर्यंत 'हे' दाक्षिणात्य सिनेमे लवकरच होणार प्रदर्शित, जाणून घ्या रिलीज डेट्स
Release dates of all major south Indian films of 2022 : प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेले अनेक दाक्षिणात्य सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहेत.
Release dates of all major south Indian films of 2022 : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहण्याची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान दाक्षिणात्य सिने-निर्माते यावर्षात अनेक बिग बजेट सिनेमे प्रदर्शित करणार आहेत. जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता दाक्षिणात्य सिनेमा रिलीज होणार आहे.
Radhe Shyam : बाहुबली स्टार प्रभास (Prabhas) आणि पूजा हेगडेचा (Pooja Hegde) 'राधे श्याम' (Radhe Shyam) सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम सोबत हिंदी भाषेतदेखील प्रदर्शित होणार आहे.
Bheemla Nayak : पवन कल्याणचा 'भीमला नायक' सिनेमा 12 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. आता हा सिनेमा 25 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
RRR : बहुचर्चित 'आरआरआर' (RRR) सिनेमाची प्रेक्षक गेली अनेक दिवस प्रतीक्षा करत आहेत. 'आरआरआर' सिनेमा 7 जानेवारी 2022 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. पण आता हा सिनेमा 25 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट, अजय देवगण, रामचरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत.
Etharkkum Thunindhavan : साऊथ स्टार सूर्याचा 'एथरक्कम थुनिंधवन' हा सिनेमा 10 मार्चला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पंडिराज यांनी केले आहे.
KGF: Chapter 2 : 'केजीएफ चॅप्टर 2' ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सुपरस्टार यश व्यतिरिक्त रवीना टंडन आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 14 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
Beast : तामिळ सुपरस्टार विजयच्या आगामी सिनेमाची रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र, हा सिनेमा एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयचा हा सिनेमा 14 एप्रिल किंवा 28 एप्रिलला रिलीज होऊ शकतो.
संबंधित बातम्या
Me Vasantrao : जिओ स्टुडिओजचा पहिला मराठी सिनेमा 'मी वसंतराव', गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Brahmanandam : सुपरस्टारहून कमी नाही कॉमेडियन ब्रह्मानंदम, एका सिनेमासाठी घेतात कोटी रुपये
Kangana Ranaut : ‘धाकड गर्ल’ कंगना रनौत बनणार होस्ट, एकता कपूरच्या शोचं करणार सूत्रसंचालन!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha