Flicker : सत्यघटनेवर आधारित 'फ्लिकर' लवकरच होणार प्रदर्शित, प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी
Flicker : 'फ्लिकर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Flicker : प्रेमाचा अनुबंध उलगडणारा 'फ्लिकर' (Flicker) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेमाचा हळूवार अनुबंध उलगडून दाखविणारा 'फ्लिकर' या आगामी मराठी सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अमोल पाडावे यांनी 'फ्लिकर' या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
'ये इश्क नही आसान' असं म्हणतात. प्रेम ही अशी एक भावना आहे, जी सर्वांच्याच मनात अपरिहार्यतेने उपजते. आयुष्यात प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या तरी प्रेमात पडतोच. अशक्य नसलेले शक्य करून दाखवण्याची ताकद प्रेमात असते. हे दाखवून देणारा सत्यघटनेवर आधारित 'फ्लिकर' हा सिनेमा प्रेमाची खरी अनुभूती प्रेक्षकांना देईल.
View this post on Instagram
'फ्लिकर' सिनेमाच्या माध्यमातून राजवीर सरकार तन्वी किशोर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या दोघांसोबत सयाजी शिंदे, संजय मोने, समीर चौघुले, शुभांगी लाटकर, पूजा पवार, अरुण कदम, गौरव रोकडे, मनिषा केळकर, मौसमी तोंडवळकर, पूर्णिमा अहिरे, सायली जाधव, प्रतीक्षा शिर्के, किशोर नांदलस्कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका सिनेमात आहेत.
संबंधित बातम्या
Bharti Singh : भारती सिंहची जागा घेतली 'या' अभिनेत्रीने, 'हुनरबाज'चं करणार सूत्रसंचालन
Chandramukhi : 'चंद्रमुखी' अमृता खानविलकर झळकली फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर
RRR OTT Release Date : राजामौलींचा 'आरआरआर' सिनेमा 'या' दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























