Chandramukhi : 'चंद्रमुखी' अमृता खानविलकर झळकली फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर
Chandramukhi : अमृता खानविलकर फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर झळकणारी पहिली मराठमोळी अभिनेत्री ठरली आहे.
Chandramukhi : बहुचर्चित 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar) साकारणार आहे. अशातच फिल्म फेअरवरच्या कव्हर पेजवर झळकणारी अमृता पहिली मराठमोळी अभिनेत्री ठरली आहे.
दिग्दर्शक प्रसाद ओकने अमृताचा फोटो शेअर करत चाहत्यांसोबत एक खास गोष्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले आहे,"अभिमान, प्रेम, अभिनंदन... फिल्मफेअरच्या डिजिटल मुखपृष्ठावर झळकणारी पहिली अभिनेत्री तू ठरली आहेस अमृता. याचा प्रचंड अभिमान वाटतो आहे. तुझे कष्ट, तुझी जिद्द, तुझी चिकाटी गेली दोन अडीच वर्ष जवळून बघतोय. त्यासाठी तुला खूप खूप प्रेम. हा बहुमान तुला मिळाला याबद्दल तुझं खूप खूप खूप अभिनंदन".
View this post on Instagram
'चंद्रमुखी' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणीवर सिनेमात भाष्य करण्यात आले आहे. चंद्रमुखी' हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे. सिनेमाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे.
संबंधित बातम्या
नसीरुद्दीन शाहांची पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीत एन्ट्री : व्हिडीओ शेअर करून मतदारांना केले आवाहन
Maha Minister : 11 लाखांच्या पैठणीची प्रेक्षकांना उत्सुकता, 'महामिनिस्टर' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Jayanti : आयुष्यातला पहिला फिल्मफेअर पुरस्कार खास! ‘जयंती’ फेम ऋतुराज वानखेडेने व्यक्त केल्या भावना!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha