एक्स्प्लोर

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'धाकड'चा टीझर प्रदर्शित

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या बहुचर्चित 'धाकड' सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धाकड'चा टीझर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या टीझरमध्ये कंगना अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

मार्व्हल स्टूडियोजचा Doctor Strange 2 'या' दिवशी होणार रिलीज

मार्व्हल स्टूडियोजचा 'डॉक्टर स्ट्रेंज इन द मल्टीवर्स ऑफ मॅडनेस'  हा चित्रपट पुढच्या महिन्यामध्ये प्रदर्शित होणार आहे.  ‘डॉक्टर स्ट्रेंज’ हा चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं 'ओपनिंग-डे'ला 8.5 कोटी डॉलरची कमाई केली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल म्हणजेच  'डॉक्टर स्ट्रेंज-2'  हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आता या चित्रपटाच्या प्री-बुकींगला देखील सुरूवात झाली आहे.

आयुष्मान खुरानाच्या 'अनेक' ची रिलीज डेट ढकलली पुढे

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या आगामी 'अनेक' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. हा सिनेमा आधी 13 मे 2022 रोजी रिलीज होणार होता. पण आता हा सिनेमा 27 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आयुष्मान खुरानाने नवे पोस्टर शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.

'भारत माझा देश आहे' सिनेमाचा टीझर प्रदर्शित

'भारत माझा देश आहे' हा देशभक्तीपर सिनेमा येत्या 6 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. पण आता टीझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जवानांच्या कुटुंबियांसोबत या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे. 

ब्रिटनी स्पीयर्स लवकरच आई होणार

पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स तिच्या वडिलांसोबत सुरू असलेल्या गार्डियनशिप प्रकरणामुळे बराच काळ चर्चेत होती. पॉप सिंगर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. आता तिने तिच्या मातृत्वाची घोषणा केली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ब्रिटनी स्पीयर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ब्रिटनीने सांगितले की, ती लवकरच आई होणार आहे. ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना ब्रिटनीने सोशल मीडियावर एक लांबलचक नोटही शेअर केली आहे.

संबंधित बातम्या

Batman On Ott : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'द बॅटमॅन' ओटीटीवर होणार रिलीज

Hemangi Kavi : आता लिंबूवर पेट्रोल फिरवणार आहे, हेमांगी कवीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Bharat Majha Desh Ahe : 'भारत माझा देश आहे' सिनेमाचा टीझर प्रदर्शित, सैनिकांच्या कुटुंबियांनी केला लॉंच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget