(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bharat Majha Desh Ahe : 'भारत माझा देश आहे' सिनेमाचा टीझर प्रदर्शित, सैनिकांच्या कुटुंबियांनी केला लॉंच
Bharat Majha Desh Ahe : 'भारत माझा देश आहे' हा देशभक्तीपर सिनेमा येत्या 6 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Bharat Majha Desh Ahe : 'भारत माझा देश आहे' (Bharat Majha Desh Ahe) हा देशभक्तीपर सिनेमा येत्या 6 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. पण आता टीझर प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जवानांच्या कुटुंबियांसोबत या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे.
'भारत माझा देश आहे' या सिनेमाच्या टीझरमध्ये देशाच्या सीमेवर सुरू झालेली लढाई ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून सर्वांच्या घराघरात पाहायला मिळत आहे. ही बातमी पाहून सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या घरच्यांची होत असलेली तळमळ पाहायला मिळत आहे. कोल्हापूरातील ज्या सैनिक टाकळी गावात या सिनेमाचे शूटिंग झाले त्याच गावात या सिनेमाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे.
पांडूरंग जाधव यांनी 'भारत माझा देश आहे' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. सिनेमाविषयी पांडूरंग जाधव म्हणाले,'भारत माझा देश आहे' हा देशभक्तीवर आधारित सिनेमा असला तरी या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला सैनिक सीमेवर तैनात असताना त्यांच्या कुटुंबियांच्या मनातील भीती, घालमेल दाखवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या सिनेमाची कथा मनाला स्पर्शून जाणारी आहे. देशसेवेवर आधारित हा सिनेमा असला तरी यातून सामाजिक संदेशही देण्यात आला आहे".
'भारत माझा देश आहे' या सिनेमाचे लेखनदेखील पांडूरंग जाधव यांनीच केले आहे. या सिनेमाला समीर सामंत यांचे गीत लाभले असून अश्विन श्रीनिवास यांनी संगीत दिले आहे. तर निशांत नाथाराम धापसे यांची पटकथा, संवाद आहेत.
'हे' कलाकार झळकणार सिनेमात
'भारत माझा देश आहे' या सिनेमात राजविरसिंह राजे गायकवाड आणि देवांशी सावंत या बाल कलाकारांसह मंगेश देसाई, शशांक शेंडे, हेमांगी कवी,छाया कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
संबंधित बातम्या