Hemangi Kavi : आता लिंबूवर पेट्रोल फिरवणार आहे, हेमांगी कवीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
Hemangi Kavi : हेमांगी कवीची फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Hemangi Kavi : मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. हेमांगीने मराठी सिनेमे, नाटक आणि मालिकांमध्ये काम केले आहे. हेमांगी सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची मतं मांडत असते. आता पुन्हा एकदा हेमांगीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेमांगी कवीने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"या पेट्रोल दरवाढी वर लिंबू फिरवायचा होता मला पण आता…लिंबू वर पेट्रोल फिरवणार आहे!” हेमांगीची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
हेमांगी कवीच्या या पोस्टवर नेटकरी मजेशीर कमेंट्स करत आहेत. याआधी प्रियंकाची 'बाई, बुब्स आणि ब्रा...' ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या पोस्टमुळे हेमांगीला ट्रोल करण्यात आले होते. 'खूप उशिरा पोहोचला पेट्रोलचा चटका', 'तुमच्या घरातली सायकल बाहेर काढा' अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकरी करत आहेत.
View this post on Instagram
हेमांगीची 'लेक माझी दुर्गा' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. तसेच ती 'पिपाणी', 'बंदीशाळा', 'डावपेच' या चित्रपटांमधील हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संबंधित बातम्या