TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -
अनुष्का शर्मा स्वत:च्या निर्मिती कंपनीतून झाली पायउतार
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने एक मोठा निर्णय घेतला आहे. 2013 साली अनुष्काने ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ नावाचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले होते. अनुष्काने तिचा भाऊ कर्णेशसोबत हे प्रॉडक्शन हाऊस सुरू केले. पण आता अनुष्काने या प्रॉडक्शन हाऊसला रामराम केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने यासंदर्भात माहिती दिली आहे.
'आरआरआर' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यानंतर 10 दिवसांसाठी तिकीट महागणार
बहुचर्चित 'आरआरआर' सिनेमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. 'आरआरआर' हा सिनेमा 25 मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा बिग बजेट सिनेमा असल्याने निर्मात्यांनी निर्मात्यांनी सरकारला तिकीट दरात वाढ करण्याचे आवाहन केले आहे.
The Kashmir Files चा विक्रम, आठव्या दिवशी सर्वाधिक कमाई
विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या 'द कश्मीर फाइल्स'ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरुच आहे. चित्रपटाने आठव्या दिवशीच 100 कोटी रुपये कमावत कमाईचे सर्व विक्रम मोडले. एवढचं नाही तर द कश्मीर फाईल्सने आठव्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आमीर खानच्या 'दंगल'चाही रेकॉर्ड मोडला आहे.
नेटफ्लिक्स कंपनी आणणार नवीन फिचर
नेटफ्लिक्स कंपनीने म्हटले आहे की, सध्या मोठ्या संख्येने लोक सदस्यत्व घेतात आणि त्यांचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड मित्र किंवा कुटुंबीयांसोबत शेअर करतात. यामुळे कंपनीच्या महसुलावर मोठा परिणाम होत आहे. एवढेच नाही तर कंपनीच्या मूळ कंटेंटवरही त्याचा परिणाम होतो. यासाठी युजर्सनी असे करणे टाळावे.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून मोहन जोशींची एक्झिट
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत. या मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत आहेत. पण आता या मालिकेत जग्गू आजोबांची भूमिका साकारणारे अभिनेते मोहन जोशी यांनी या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तर प्रदीप वेलणकर जग्गू आजोबांची भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या