एक्स्प्लोर
AIB प्रकरण : रणवीर सिंग-अर्जुन कपूर मुंबई हायकोर्टात
एआयबीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह भाषा आणि बिभत्सता दाखवल्याप्रकरणी मुंबईतील गिरगाव कोर्टाने मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश फेब्रुवारी 2015 मध्ये दिले होते.
मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग आणि अभिनेता अर्जुन कपूर यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. एआयबी प्रकरणी दाखल झालेला एफआरआय रद्द करण्याची मागणी दोघांनी याचिकेत केली आहे.
मुंबईत वरळीमधील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये डिसेंबर 2014 मध्ये 'एआयबी'चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आक्षेपार्ह भाषा आणि बिभत्सता दाखवल्याप्रकरणी मुंबईतील गिरगाव कोर्टाने मुंबई पोलिसांना एफआयआर दाखल करण्याचे आदेश फेब्रुवारी 2015 मध्ये दिले होते.
एफआयआरमधील आरोप चुकीच्या हेतूने करण्यात आले असून त्यातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा दावा रणवीर-अर्जुनने याचिकेत केला आहे. अश्लील आणि शिवराळ शब्द वापरणं म्हणजे बिभत्सता नसल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.
जस्टिस आर. एम. सावंत आणि जस्टिस सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे. एआयबी प्रकरणात रणवीर-अर्जुनसोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांचीही नावं आहेत.
बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेच एआयबीच्या आयोजकांवरही अनेक नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता. महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत असताना दीपिका-आलिया अशा कार्यक्रमात स्त्रियांविरोधी विनोदांवर कशा हसू शकतात, असा प्रश्न तक्रारकर्त्यांनी विचारला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement