एक्स्प्लोर
Advertisement
दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली, अपोलो रुग्णालयात दाखल
मणिरत्नम हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अतिशय मोठं नाव आहे. त्यांच्यासोबत काम करणं ही प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं.
मुंबई : प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांची प्रकृती बिघडली असून त्यांचा चेन्नईतील अपोलो रुग्णालयता दाखल करण्यात आलं आहे. 63 वर्षीय मणिरत्नम यांना हृदयाशी संबंधित आजार असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सध्या त्यांच्या प्रकृतीविषयी कोणहीती माहिती मिळालेली नाही.
हृदयाशी संबंधित आजारामुळे ते रुग्णालयात दाखल असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वीच आलं होतं. त्यांच्यावर मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. आता त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मणिरत्नम हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती ट्विटरवरुन शेअर करण्यात आली.
दरम्यान, मणिरत्नम यांना 2004 मध्ये युवा चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर कार्डिअॅक प्रॉब्लेममुळे 2015 मध्येही त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मणिरत्नम हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अतिशय मोठं नाव आहे. त्यांच्यासोबत काम करणं ही प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं. मणिरत्नम यांचं नाव ऐकताच आपल्या मनात मागील दशकातील काही ब्लॉकबस्टर सिनेमाच्या आठवणी ताज्यात होतात. दिग्दर्शक, निर्माते, पटकथकार मणिरत्नम यांनी गुरु, बॉम्बे, दिल से, रोजा, युवा, रावण, गुरुसह अनेक दर्जेदार चित्रपट बनवले आहेत.Director #ManiRatnam admitted to Greams Road Apollo hospital due to cardiac problems. pic.twitter.com/YnnIH6PHpI
— Lokesh (@LokeshJey) June 16, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement