Filmfare OTT Awards 2023 : 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स'मध्ये 'जुबली'चा जलवा! आलिया भट्ट ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी
Filmfare OTT Awards : 'फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स'मध्ये 'जुबली' (Jubilee) या वेबसीरिजला सर्वाधिक अवॉड्स मिळाले आहेत.
Filmfare OTT Awards 2023 : 'फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स 2023' (Filmfare OTT Awards 2023) हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या बहुचर्चित पुरस्कार सोहळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अनेक सिनेमे आणि वेबसीरिजला पारितोषिक मिळालं आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग', 'कोहरा','स्कूप', 'डार्लिंग्स', 'सिर्फ एक बंदा काफी है' आणि 'जहान' सारख्या वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या वेबसीरिज आणि सिनेमांना अवॉर्ड देण्यात आला आहे. पण विक्रमादित्य मोटवानी (Vikramaditya Motwane) यांच्या 'जुबली' (Jubilee) या वेबसीरिजला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...
'फिल्मफेअर ओटीटी अवॉड्स 2023' विजेत्यांची यादी... (Filmfare OTT Awards 2023 Winner Full List)
वेबसीरिज (Web Series)
- सर्वोत्कृष्ट वेब सीरिज - स्कूप
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - सुविंदर विक्की (कोहरा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - राजश्री देशपांडे (ट्रायल बाय फायर)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - विक्रमादित्य मोटवानी (जुबली)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - वरुण सोबती (कोहरा)
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - तिलोतमा सोमे (दिल्ली क्राइम 2)
- सर्वोत्कृष्ट कथानक - गुंतीत चोप्रा आणि दिग्गी सिसौदिया (कोहरा)
- सर्वोत्कृष्ट संकलन - आरती बजाज (जुबली)
- सर्वोत्कृष्ट छायांकन - प्रतीक शाह (जुबली)
- सर्वोत्कृष्ट संगीत - अलोकानंद दासगुप्ता (जुबली)
चित्रपट (Movies)
सर्वोत्कृष्ट चित्रपट - एक बंदा काफी है
सर्वोत्कृष्ट अभिनेता - मनोज वाजपेयी (एक बंदा काफी है)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - आलिया भट्ट (डार्लिंग्स)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अपूर्व सिंह (एक बंदा काफी है)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - सूरज शर्मा
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - शेफाली शाह (डार्लिंग्स) आणि अमृता सुभाष (द मिरर आणि लस्ट स्टोरीज 2)
सर्वोत्कृष्ट कथानक - दीपक किंगरानी (सिर्फ एक बंदा काफी है)
'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स'मध्ये 'जुबली'चा जलवा!
'जुबली' (Jubilee) या वेबसीरिजच्या दिग्दर्शनाची धुरा विक्रमादित्य मोटवानीने सांभाळली आहे. या सीरिजमध्ये अदिती राव हैदरी, अपारशक्ति खुराना, वामिका गब्बी, सिद्धांत गुप्ता, नंदीश संधू आणि राम कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहे. स्टारकास्टच्या रेट्रो लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल. प्रेम, भांडण, राजकारण अशा अनेक गोष्टी या सीरिजमध्ये पाहायला मिळत आहेत. 'जुबली' या सीरिजचं जगभरात कौतुक होत आहे. 'फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2023' खूपच खास ठरलं आहे. वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या विविध धाटणीच्या वेबसीरिज आणि सिनेमांचा यंदा गौरव करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या