एक्स्प्लोर
फिल्मफेअरची बाहुली दंगलला, आलिया सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
मुंबई : बॉलिवूडमध्ये मानाचा समजल्या जाणारा 62 वा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात दंगलनेच बाजी मारली आहे. बॉलिवूडमधील दिग्गजांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शाहरुख खान, करण जोहर आणि कपिल शर्मानं रंगत आणली.
मुंबईत झालेल्या फिल्मफेअर सोहळ्यात सर्वोत्कृष्ट सिनेमाचा मान यावर्षी दंगलला मिळाला आहे. तर सर्वोत्तम अभिनेत्याचा मान दंगलमधील अभिनयासाठी आमीर खानला मिळाला आहे. तर मानाचा समजला जाणारा जीवनगौरव पुरस्कार शत्रुघ्न सिन्हा यांना देण्यात आला.
फिल्मफेअर पुरस्कार 2017
सर्वोत्कृष्ट सिनेमा : दंगल
सर्वोत्कृष्ट अभिनेता : आमीर खान(दंगल)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट(उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : नितेश तिवारी (दंगल)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : ऋषी कपूर (कपूर अँड सन्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : शबाना आझमी (नीरजा)
सर्वोत्कृष्ट गायक : अरिजित सिंह (ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट गायिका : नेहा भसिन (जग घुमेया-सुलतान)
सर्वोत्कृष्ट कथा आणि पटकथा : कपूर अँड सन्स
सर्वोत्कृष्ट अक्शन : दंगल
सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोर : कपूर अँड सन्स
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन : कर गयी चुल (कपूर अँड सन्स)
सर्वोत्कृष्ट वेशभुषा : उडता पंजाब
सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी : नीरजा
सर्वोत्कृष्ट एडिटिंग : नीरजा
सर्वोत्कृष्ट व्हीएफएक्स : फॅन
सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाईन : फोबिया
सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन : नीरजा
सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (चन्ना मेरेया-ऐ दिल है मुश्किल)
सर्वोत्कृष्ट कथा : कपूर अँड सन्स
सर्वोत्कृष्ट पटकथा : कपूर अँड सन्स
सर्वोत्कृष्ट संवाद : पिंक
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : ऐ दिल है मुश्किल
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण : अश्विनी अय्यर तिवारी (नील बट्टे सन्नाटा)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनय (पुरुष) : दिलजीत दोसान्झ (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनय (स्त्री) : रितिका सिंह (साला खडूस)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (परिक्षकांची पसंती) : सोनम कपूर (नीरजा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (परिक्षकांची पसंती) : मनोज वाजपेयी (अलीगढ) आणि शाहिद कपूर (उडता पंजाब)
सर्वोत्कृष्ट सिनेमा (परिक्षकांची पसंती) : नीरजा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement