Fighter Advance Booking : हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; 'फायटर'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात
Fighter Movie : हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
Fighter Advance Booking : 'जवान','पठाण','गदर 2','अॅनिमल' आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'सह अनेक सिनेमांनी 2023 हे वर्ष गाजवलं आहे. 2024 चीदेखील दमदार सुरुवात झाली आहे. आता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) यांच्या 'फायटर' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
हृतिक रोशन, दीपिका पादुकोण आणि अनिल कपूर (Anil Kapoor) यांचा 'फायटर' हा या वर्षातला बिग बजेट सिनेमा आहे. सिद्धार्थ आनंदने (Siddharth Anand) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 25 जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'फायटर' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा टीझर आऊट झाला होता. 'हीर आसमानी','इश्क जैसा कुछ' आणि 'शेर खुल गए' ही सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर प्रेक्षक अॅडव्हान्स बुकिंगची प्रतीक्षा करत होते. अखेर आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
View this post on Instagram
'फायटर'ची प्रेक्षकांना उत्सुकता
'फायटर' हा सिनेमा 2024 ची धमाकेदार सुरुवात करणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हृतिकचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यामुळे हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरणार आहे. या सिनेमातील संवाद, आकर्षक सीन्स, शानदार वीएफएक्स पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
'फायटर' पहिल्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवणार?
फायटर हा सिनेमा 2 तास,46 मिनिटे आणि 35 सेकंदाचा आहे, असे म्हटले जात आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 35-38 कोटींची कमाई करेल. तर एका आठवड्याच्या आत हा सिनेमा 100 कोटींचा गल्ला जमवू शकतो. प्रेक्षकांना या सिनेमात अॅक्शनचा तडका आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. आता 'फायटर' हा सिनेमा शाहरुखच्या 'जवान' (Jawan), 'पठाण'चा (Pathaan) रेकॉर्ड मोडणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणार आहे.
संबंधित बातम्या