Father’s Day 2022, Boman Irani : ‘कधीही न ऐकलेले वडिलांचे शब्द’, बोमन ईरानींनी शेअर केली भावस्पर्शी कविता!
Boman Irani : ज्येष्ठ अभिनेते बोमन ईरानी (Boman Irani) यांनी नुकतेच डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज ‘मासूम’मधून त्यांनी डिजिटल विश्वात पाऊल टाकले आहे.
Boman Irani : ज्येष्ठ अभिनेते बोमन ईरानी (Boman Irani) यांनी नुकतेच डिजिटल विश्वात पदार्पण केले आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर वेब सीरिज ‘मासूम’मधून त्यांनी डिजिटल विश्वात पाऊल टाकले आहे. या वेब सीरिजमध्ये अभिनेते बोमन यांनी एका वडील-मुलीमधील गुंतागुंतीचे नाते दाखवले आहे. या सीरिजच्या आणि ‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्यांनी एक पालक आणि मूल यांच्यातील आव्हानात्मक नाते दर्शवणारी एक हृदयस्पर्शी कविता शेअर केली आहे. या कवितेतून बोमन यांनी एक बाबा आपल्या मुलांचे सदैव रक्षण कसे करतो, याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
या कवितेचे नाव आहे ‘अ फादर्स अनसेड वर्ड्स’. या भावस्पर्शी कवितेतून त्यांनी सगळ्याच चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. त्यांची ही कविता ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी तरळले आहे.
काय आहे ही कविता?
बोमन ईरानी यांनी आपल्या कवितेत पितृत्वाचे विविध पैलू सादर केले आहे. एक बाप आपल्या मुलांच्या भल्यासाठी नेहमीच काळजीत असतो. कदाचित तो त्यांच्याबद्दलच्या भावना आणि आपुलकी थेट व्यक्त करू शकत नाही. पण, एक पिता नेहमीच आपल्या मुलांची साथ देतो, मग त्यांच्या आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला तरी... बोमन ईरानी त्यांच्या कवितेत म्हणतात, ‘मैनु माफ़ करीं तू मिथिये, मैं तनु ऐ समझा न सका; तैनु प्यार मैं किन्ना करदा हां, ऐ कदी मैं जाता न सका।‘
पाहा कविता
वडील हे कौटुंबिक आकाशातील सूर्यासारखे उबदार असतात आणि आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश आणतात. याबद्दल बोलताना बोमन म्हणाले, ‘वडील आणि त्यांच्या मुलांमधील नातेसंबंधावर क्वचितच चर्चा केली जाते. पण, ते त्यांच्या मुलांच्या विकासामागचे मूक आधारस्तंभ असतात. नातं घट्ट होण्यासाठी प्रेम उघडपणे व्यक्त करणं गरजेचं असतं.’ बोमन ईरानी म्हणाले की, ‘या फादर्स डेला, आपण आपल्या मुलांशी जितके शक्य तितके मोकळेपणाने बोलूया आणि आपण त्यांना हवे असलेले बाबा बनूया. दयाळू, प्रेमळ आणि प्रेरणादायी असे नवीन पितृत्व निर्माण करूया.’
हेही वाचा :
TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या