जानव्ही कपूर बेडरुममध्ये मुलासोबत दिसली अन् वडील बोनी कपूर संतापले, लाडक्या लेकीला दिली होती शिक्षा!
Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने एक किस्सा सांगितला होता. तिने सांगितल्यानुसार तिच्या वडिलांनी तिला बेडरुममध्ये एका मुलासोबत पाहिले होते.
Janhvi Kapoor : जान्हवी कपूर ही बॉलिवुडमधील एक दिग्गज अभिनेत्री आहे. चित्रपटांसोबतच ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. याआधी ती अनेकवेळा तिच्या बॉयफ्रेंडसोबत एकत्र दिसलेली आहे. तिच्या या रिलेशनशीपचीही तेवढीच चर्चा होत असते. दरम्यान, जान्हवी कपूर सध्याजरी तिच्या बॉयफ्रेंडसोबत दिसत असली तरी कधीकाळी बेडरुमध्ये एका मुलासोबत दिसल्यामुळे तिच्या वडिलांनी तिला चांगलीच शिक्षा केली होती.
वडिलांनी मुलासोबत पाहिले होते
जान्हवी कपूरनेच या घटनेबाबत स्वत: सांगितलेले आहे. जान्हवी कपूर मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटाच्या प्रचारासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांत जात होती. अशाच एका कार्यक्रमात तिने ही घटना सांगितली होती. तिच्या वडिलांनी म्हणजेच बोनी कपूर यांनी तिला एकदा बेडरुममध्ये एका मुलासोबत पाहिले होते, ज्यामुळे तिला शिक्षादेखील झाली होती.
तेव्हा नेमके काय घडले होते?
लवकरच तिचा परम सुंदरी हा चित्रपट येणार आहे. याआधी जान्हवी कपूरने मॅशेबल इंडिया यूट्यूब चॅनेलला तेव्हा मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने हा किस्सा सांगितला होता. "आम्ही आमच्या जुन्या घरात राहायचो, तेव्हाची ही गोष्ट आहे. तेव्हा मी एका मित्राला माझ्या घरी बोलावले होते. तो जेव्हा माझ्या घरी आला होता, तेव्हा आमच्या घरी कोणीही नव्हते. बेडरुममध्ये बसून आम्ही गप्पा करत होते. त्याच वेळी माझे वडील घरी आले. वडील घरी आल्यानंतर मला काहीच समजले नाही. मग मी माझ्या मित्राला खिडकीतून उडी मारायला सांगितले. मित्र खिडकीतून गेल्यावर माझ्या वडिलांना समजणार नाही, असा माझा विचार होता. मात्र माझ्या वडिलांनी सीसीटीव्ही चेक केले. त्यात सगळं दिसलं. माझा सगळा प्लॅन माझ्यावरच उलटा पडला. त्यानंतर मला माझ्या वडिलांनी चांगलीच शिक्षा केली. त्यानंतर माझ्या वडिलांनी सर्व खिडक्यांना ग्रिल लावल्या," अशी आठवण जान्हवी कपूरने सांगितली.
View this post on Instagram
तिचे कोणकोणते चित्रपट येणार?
दरम्यान, जान्हवी कपूरचा देवरा हा चित्रपट नुकताच आला होता. या चित्रपटात सिनेरसिकांनी तिचा अभिनय यासह तिचे नृत्य आवडले होते. या अभिनेत्रीच्या आगामी चित्रपटाचे नाव परम सुंदरी असे आहे. यासह तिचा वरुण धवन याच्यासोबत 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा चित्रपट येणार आहे. ती सध्या शिखर पहाडिया याला डेट करत आहे. मात्र अद्याप त्यांनी आपल्या या नात्याला ऑफिशियली जाहीर केलेले नाही. हे दोघेही पार्टी तसेच इतर कार्यक्रमांत एकत्र दिसतात.
हेही वाचा :
Sonam Kapoor : सोनम कपूरचा मनमोहक अंदाज; पिवळ्या ड्रेसमध्ये दिसतेय खास!