एक्स्प्लोर

India Biggest Box Office Flop Movie: 45 कोटींमध्ये बनलेली भारताची 'ती' फिल्म, ज्यामुळे इंडस्ट्रीनं 99.99 टक्यांचा तोटा सोसला, OTT नं तर डील कॅन्सल केली

India Biggest Box Office Flop Movie: फिल्म तयार होण्यासाठी तब्बल 45 कोटींचं भांडवलं लागलं होतं. पण, रिलीजनंतर मात्र हा चित्रपट जोरदार आदळला आणि भारताचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.

India Biggest Box Office Flop Movie: बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक नवे चित्रपट दररोज म्हटलं तरी, रिलीज होत असतात. आजवर अनेक फिल्म अशा आल्या ज्यांनी बॉक्स ऑफिस (Box Office) फक्त गाजवलंच नाहीतर, छप्पडफाड कमाईदेखील केली. पण, अनेक फिल्म अशा आहेत, ज्यांना कास्टिंग आणि VFX वैगरेमध्ये एवढे पैसे लागले की, त्या चित्रपटांसाठी लागलेल्या भांडवलापुढे आभाळही ठेंगणं वाटू लागलं. असाच एक चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार करण्यात आला होता. कोट्यवधींच्या भांडवलात हा चित्रपट तयार झाला आणि रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर मात्र जोरात आदळला. एवढा की, या चित्रपटानं त्याच्या कमाईच्या अर्धी रक्कमही वसूल केली नाही. ही फिल्म तयार होण्यासाठी तब्बल 45 कोटींचं भांडवलं लागलं होतं. पण, रिलीजनंतर मात्र हा चित्रपट जोरदार आदळला आणि भारताचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला. इंडस्ट्रीला यामुळे 99.99 टक्क्यांचं नुकसान झालं होतं. कारण, कमाई फक्त 60 हजार रुपयांची केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे, या चित्रपटात अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर हे दोन स्टार्स झळकले होते. 

500 तिकीटंही विकली गेली नव्हती 

सर्वात मोठा फ्लॉप ठरलेला हा क्राईम-थ्रीलर चित्रपट भूषण कुमार यांच्या टी-सीरीज बॅनर अंडर बनवण्यात आली होती आणि 2022 मध्ये याची मेकिंग सुरू करण्यात आली होती. असं सांगितलं जात आहे की,  2023 मध्ये या फिल्मची दुसऱ्यांदा शुटिंग झाल्यामुळे याचं बजेट वाढलं होतं. पण, नशीब एवढं खराब होतं की, रिलीजनंतर या फिल्मला कुणी डिस्ट्रीब्युटर मिळालाच नाही. पहिल्या दिवशी भारतात फक्त 293 तिकीटं विकली गेली होती. याचं लाईफटाईम कलेक्शन 1 लाख रुपयांपेक्षाही कमी होतं. 

अपूर्ण फिल्म केलेली रिलीज, OTT डील झालेली कॅन्सल 

अर्जून कपूर आणि भूमी पेडणेकर स्टारर फिल्म प्लॉप होण्यासाठी कारण सांगितलं जातं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, The Lady Killer अपूर्णच रिलीज झाली होती. याचा क्लायमॅक्सही पूर्ण शूट केला नव्हता. दिग्दर्शकांनी सुरुवातीला ही गोष्ट मान्य केली होती. पण, नंतर मात्र अपूर्ण फिल्म रिलीज केल्याचं अमान्य केलं होतं. असंही म्हटलं जातं की, फिल्मला फक्त एक टोकन रिलीज मिळाली होती. मेकर्सनी डिसेंबर 2024 मध्ये याच्या स्ट्रिमिंगसाठी नेटफ्लिक्ससोबत डीलही केली होती. पण, यासाठी त्यांना फिल्मला नोव्हेंबर 2023 मध्ये रिलीज करायचं होतं. कारण जर असं केलं नसतं, तर डील अमान्य झाली असती. याच कारणानं त्यांनी अपूर्ण राहिलेली फिल्म रिलीज करून टाकली होती. 

कुठे पाहु शकता सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट 'द लेडी किलर'

फिल्मचं प्रमोशनही केलं नाही. ट्रेलर रिलीजसाठी एक इव्हेंट पार पडला होता, पण त्यानंतर अॅक्टर्सनी याचं कोणतंही प्रमोशन केलं नाही. त्यानंतर मूव्ही रिलीज झाल्यानंतर याचा परफॉर्मन्स एकदम खराब होता. तिकीटं विकणं बंद झालेली. नंतर तर, स्ट्रीमिंग रिलीजही कॅन्सल केली होती. कारण, नेटफ्लिक्सनंही फिल्मचा रिस्पॉन्स पाहून एक पाऊल मागे टाकण्यास सुरुवात केली होती. 'द लेडी किलर'ला सप्टेंबर 2024 मध्ये टी-सीरीजसाठी  YouTube चॅनलवर मोफत रिलीज करण्यात आलं. YouTube वर ही फिल्म 3.5 मिलियन वेळा पाहिली गेली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

ना कोणी सुपरस्टार, ना कुणी दिग्गज अभिनेत्री; तरीदेखील खिळवून ठेवते 1 तास 33 मिनिटांची सस्पेंस-थ्रिलर फिल्म, तुम्ही पाहिलीय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget