एक्स्प्लोर
VIDEO : भर थिएटरमध्ये ‘झिंगाट’वर सांगलीकर ‘सैराट’

सांगली : आज प्रदर्शित झालेल्या नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमाने महाराष्ट्रात अक्षरशः धमाल माजवली आहे. राज्यातील मोठ्या शहरांमध्येच नव्हे, तर छोट्या-छोट्या शहरांमध्येही सैराटची धूम पहायला मिळते आहे.
सांगलीच्या प्रताप थिएटरमध्येही प्रेक्षकांनी सिनेमा अक्षरशः डोक्यावर घेतला. प्रदर्शनापूर्वीच गाजलेल्या झिंगाट गाण्याच्या तालावर प्रेक्षकांनी थिएटरमध्येच ताल धरला.
राज्यभरात सैराट सिनेमाला पहिल्याच दिवशी स्टँडिंग ओव्हिएशन मिळालं. अनेक ठिकाणी हाऊसफुलचे बोर्ड झळकलेले पहायला मिळाले. तसंच प्रेक्षकांच्या सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं पहायला मिळतं आहे.
सैराट सिनेमाला राज्यभरात अपेक्षेप्रमाणेच मोठा प्रतिसाद मिळतो. अनेक जण सिनेमाचा पहिलाच शो बघण्यासाठी उत्सुक होते. फँड्रीनंतर नागराज मंजुळे दिग्दर्शित हा दुसरा सिनेमा आहे. आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच सिनेमात रिंकू राजगुरु या उभरत्या अभिनेत्रीनं या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. उत्कृष्ट संगीत, दिग्दर्शन यामुळे हा सिनेमा अनेकांच्या पसंतीस येताना दिसतो आहे.
पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
नांदेड
राजकारण
Advertisement
Advertisement
























