Nitish Kumar Reddy : 6, 6, 4, 6 रथी महारथींनी गुडघे टेकले, पण नवख्या नितीश रेड्डीनं स्टार्क अन् बोलँडवर काऊंटर अटॅक करत कांगारुंना पाणी पाजलं!
स्टार्क आणि बोलँडच्या वादळात टीम इंडियाचे धुरंदर अडखळल्याचे दिसून आले. मधल्या फळीत आलेल्या नितीश रेड्डीने दुसऱ्या बाजूने विकेट कोसळू लागल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत काऊंटर अटॅक केला.
Nitish Kumar Reddy : ॲडलेड कसोटीत भारतीय संघ 180 धावांवर गडगडला. भारताकडून नितीश रेड्डी याने सर्वाधिक 42 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 6 विकेट घेतल्या. तर स्कॉट बोलँड आणि कर्णधार पॅट कमिन्सने 2-2 विकेट घेतल्या.
ॲडलेड पिंक टेस्टमध्ये भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती. या सामन्यात मिचेल स्टार्कने पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वालला (0) बाद केले. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी सावध खेळ केला. यानंतर दोघांनी स्कोअरकार्ड 69 धावांपर्यंत नेले. स्टार्कने केएल राहुलला (37) नॅथन मॅकस्विनीकडे झेलबाद केले. यानंतर विराट कोहलीही अवघ्या 7 धावा करून मिचेल स्टार्कच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथकडे झेलबाद झाला. कोहली बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 77 धावा होती. यानंतर काही वेळातच शुभमन गिल 31 धावा करून स्कॉट बोलंडच्या चेंडूवर बाद झाला. गिल बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या 81/4 झाली.
Nitish Kumar Reddy in Australia:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 6, 2024
- 41(59) (from 73/6 to 150).
- 38(27).
- 42(54) (from 87/5 to 180).
- NKR THE CRISIS MAN ALREADY, HE IS HERE TO STAY...!!! 🔥 pic.twitter.com/fzVlSR6w9Y
संघात पुनरागमन करणारा रोहित शर्मा अवघ्या 3 धावा करून स्कॉट बोलंडच्या चेंडूवर LBW आऊट झाला. रोहित बाद झाला तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 87/5 होती. दुसरीकडे, ऋषभ पंत (21) याने एका बाजूने विकेट पडणे हाताळण्याचा प्रयत्न केला परंतु तोही 109/6 धावांवर बाद झाला. यानंतर नितीश रेड्डीला रविचंद्रन अश्विन (22) यांची थोडीफार साथ मिळाली. पण अश्विनने मिचेल स्टार्कला एलबीडब्ल्यू आऊट केले.
नितीश रेड्डीचा काऊंटर अटॅक
स्टार्क आणि बोलँडच्या वादळात टीम इंडियाचे धुरंदर अडखळल्याचे दिसून आले. मधल्या फळीत आलेल्या नितीश रेड्डीने दुसऱ्या बाजूने विकेट कोसळू लागल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत काऊंटर अटॅक केला. त्याने पहिल्यांदा स्टार्कवर आक्रमण करताना 41व्या षटकात जबरदस्त षटकार ठोकला. त्यानंतर 42व्या षटकातही तुफानी फटकेबाजी करताना बोलँडवर प्रहार केला. त्याने 2 षटकार आणि एका चौकारासह 21 धावा कुटल्या. संघाची धावसंख्या दोनशेच्या घरात नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या नितीशचा वारू अखेर 45व्या षटकात रोखला गेला. स्टार्कनेच त्याला बाद करत टीम इंडियाचा डाव 180 धावांमध्ये संपवला.
Now THIS is entertaining stuff from Nitish Kumar Reddy!#AUSvIND pic.twitter.com/JgsupvPUkN
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2024
तत्पूर्वी, अश्विननंतर आलेला हर्षित राणा (0) मिचेल स्टार्कचा बळी ठरला. राणा बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या 141/8 झाली. मिचेल स्टार्कने राणाच्या रूपाने पाचवी विकेट घेतली. अशाप्रकारे त्याला बाद करून त्याने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यात प्रथमच पाच बळी पूर्ण केले. उपकर्णधार जसप्रीत बुमराहच्या (0) रूपाने भारताला नववा धक्का बसला. कांगारूंचा कर्णधार पॅट कमिन्सने बुमराहला उस्मान ख्वाजाने झेलबाद केले. बुमराह बाद झाल्यावर भारतीय संघाची धावसंख्या 176/9 झाली. नितीश रेड्डी शेवटी बाद झाला.
इतर महत्वाच्या बातम्या