Entertainment News Live Updates 28 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Ekdam Kadam Marathi Movie : कॉलेजलाईफ अनुभवणाऱ्या तरुणाईंचा 'एकदम कडक' धुडगूस पाहा येत्या 2 डिसेंबरला
Ekdam Kadam Marathi Movie : 'एकदम कडक' (Ekdam Kadam) चित्रपटाचे एकामागून एक येणारे पोस्टर धुमाकूळ घालत आहेत. कॉलेज लाईफ अनुभवणाऱ्या मुलांचे पोस्टर प्रेक्षकांना चांगलेच आवडले. त्यानंतर आता मुलींच्याही पोस्टरची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत 'बबन' चित्रपटातून रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री गायत्री जाधव (Gayatri Jadhav), प्रांजली कझारकर (Pranjali Kazharkar), जयश्री सोनावणे (Jayashree Sonavane) या अभिनेत्री एकदम कडक अंदाजात पाहायला मिळणार असून अभिनेत्री भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) शिवाय अभिनेता पार्थ भालेराव (Parth Bhalerao), चिन्मय संत (Chinmay Sant) तसेच सैराट फेम तानाजी गलगुंडे आणि अरबाज हा तरुण कलाकारांचा ग्रुप रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता कॉलेजच्या मुली त्यांची कॉलेजलाईफ जगतायत, आणि ती कशी जगतायत हे येत्या 2 डिसेंबरला चित्रपटगृहात पाहणे रंजक ठरणार आहे.
Mili : '20 दिवस उणे 15 डीग्री फ्रीजरमध्ये...' जान्हवी कपूरसाठी 'मिली'ची भूमिका किती कठीण होती?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिली' चित्रपटामुळे चर्चेत आहे. 15 ऑक्टोबरला मिलीचा ट्रेलर रिलीज झाला होता, ज्यामध्ये जान्हवीची व्यक्तिरेखा पाहून सगळेच थक्क झाले. जान्हवी कपूरचा 'मिली' हा चित्रपट येत्या 4 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. दरम्यान, ही भूमिका किती कठीण होती हे जान्हवी कपूरने सांगितलं आहे.
ब्रह्मास्त्र या दिवशी ओटीटीवर प्रदर्शित होणार
OTT अॅप डिस्ने प्लस हॉटस्टारनच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला आहे. यासोबतच या पोस्टमध्ये ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीज डेटचीही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, पुढील महिन्यात 4 नोव्हेंबर रोजी ब्रह्मास्त्र OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित होईल. ब्रह्मास्त्रचा चित्रपट निर्माता करण जोहरनेही हीच पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. आणि म्हटले आहे की, मोठ्या पडद्यापासून तुमच्या हृदयापर्यंत आणि आता तुमच्या पडद्यावर या वर्षातील सर्वात हिट हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्र ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ब्रह्मास्त्रच्या ओटीटी रिलीजच्या घोषणेने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
Amruta Subhash: अमृता सुभाष आणि संदेश कुलकर्णी होणार आई-बाबा; अभिनेत्रीच्या पोस्टनं वेधलं लक्ष, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
Amruta Subhash: मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील आपल्या अभिनयानं विशेष ओळख निर्माण करणारी अभिनेत्री अमृता सुभाषनं (Amruta Subhash) नुकतीच चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. अमृतानं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टला कमेंट करुन अनेक सेलिब्रिटी आणि अमृताचे चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
View this post on Instagram
Shiv Kumar Khurana passes away: चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक शिव कुमार खुराना यांचे निधन; वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Shiv Kumar Khurana passes away: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक शिव कुमार खुराना (Shiv Kumar Khurana) यांचे निधन झाले आहे. मुंबईमधील ब्रह्मकुमारी ग्लोबल रुग्णालयात वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1999 मध्ये रिलीज झालेल्या जालसाज या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी केले. हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता.
Shah Rukh Khan: खेळाडूंच्या मानधनाबाबत बीसीसीआयचा ऐतिहासिक निर्णय, शाहरूखकडून कौतुक, म्हणाला...
Shah Rukh Khan On Women Cricket Team Equal Payment: नुकताच बीसीसीआयनं एक मोठा निर्णय घेतला आहे. पुरुष क्रिकेटर्सप्रमाणेच महिला क्रिकेटर्सनाही समान मानधन मिळणार असल्याची घोषणा बीसीसीआयकडून करण्यात आली. बीसीसीआय सचिव जय शाहा (Jay Shah) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. ज्यानुसार आता कसोटी सामन्यांसाठी 15 लाख, वनडेसाठी 6 लाख तर टी-20 सामन्यांसाठी 3 लाख खेळा़डूंना मिळणार आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. बीसीसीआयच्या या निर्णयाबाबत नुकतच अभिनेता शाहरुख खाननं ( Shah Rukh Khan) एक खास ट्वीट केले आहे.
What a good front foot shot. Sports being such an equaliser ( in more ways than one ) hoping it will pave the way for others to follow. https://t.co/Ko1pZpWm8z
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 27, 2022
Ram Setu Box Office Collection: अक्षय कुमारची बॉक्स ऑफिसवर जादू नाहीच; जाणून घ्या राम सेतूचं कलेक्शन
Ram Setu Box Office Collection: रिलीज झाल्यानंतर दोन दिवसात 26 कोटींची कमाई केल्यानंतर तिसऱ्या दिवशी ‘राम सेतू’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये 30 टक्क्यांची घसरण झाली आहे. अक्षयच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 15.25 कोटींचे कलेक्शन केले होते. दुसऱ्या दिवशी 'राम सेतू'ने 11.40 कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (27 ऑक्टोबर) 'राम सेतू'ने 7.80 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यानंतर चित्रपटाची एकूण कमाई 34.45 कोटींवर गेली आहे.
Pushkar Shrotri: '36 गुण' मध्ये पुष्कर श्रोत्री साकारणार 'ही' भूमिका; 4 नोव्हेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Pushkar Shrotri: अभिनेता पुष्कर श्रोत्री (Pushkar Shrotri) त्याच्या 'हॅप्पी गो लकी' स्वभामुळे प्रत्येकाला जवळचा वाटतो. मालिका, चित्रपट, नाटक, वेबसीरीज या साऱ्या माध्यमांमध्ये लीलया वावरणारा हा अभिनेता आता ‘समुपदेशक’ म्हणून काम करणार आहे. गैरसमजामुळे विस्कटलेल्या नात्यांमध्ये सुसंवाद घडवून आणण्याच्या कामासाठी पुष्करने पुढाकार घेतला आहे. समुपदेशक म्हणून त्याची नवी इनिंग यशस्वी होते का? हे पाहण्यासाठी तुम्हाला आगामी ‘36 गुण’ हा मराठी चित्रपट पहावा लागेल. या चित्रपटात तो समुपदेशकाच्या भूमिकेत दिसणार आहे. पुष्करचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना यात पहायला मिळेल. समित कक्कड दिग्दर्शित '36 गुण' चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
View this post on Instagram