एक्स्प्लोर

Entertainment News Live Updates 12 october : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

LIVE

Key Events
Entertainment News Live Updates 12 october : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Background

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

कतरिना, सिद्धांत आणि ईशान यांच्या 'फोन भूत' चा ट्रेलर रिलीज; चित्रपट 'या' दिवशी होणार प्रदर्शित

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) , अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टर (Ishaan khatter) अभिनीत 'फोन भूत'च्या पहिल्या पोस्टरपासूनच प्रेक्षक चित्रपटाची झलक पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दर्शकांची उत्सुकता लक्षात घेऊन निर्मात्यांनी 'फोन भूत' (PhoneBhoot) चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित केला. हॉरर कॉमेडी या मनोरंजक शैलीसाठी हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतानाच, कतरिना कैफला प्रथमच सुंदर भूताच्या रुपात पाहण्यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. अखेरीस, आता प्रतीक्षा संपली असून, निर्मात्यांनी आज 'फोन भूत'चा विस्मयकारक ट्रेलरचे अनावरण केले आहे.

विक्रम वेधा’ने पार केला 100 कोटींचा टप्पा! बॉक्स ऑफिसवर दिसली ह्रतिक-सैफच्या जोडीची जादू!

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांचा 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊन आता 10 दिवस उलटले आहेत. बॉक्स ऑफिसच्या जगतात या चित्रपटाने एक मैलाचा टप्पा पार केला आहे. होय, 'विक्रम वेधा'ने जगभरात 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर, रिलायन्स एंटरटेनमेंटच्या प्रॉडक्शन अंतर्गत तयार झालेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 10 दिवसांत एकूण 69 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Karwa Chauth: सर्व प्रकारचे सण, उत्सव, परंपरा या बॉलिवूड चित्रपटांमध्ये बघायला मिळतात. उद्या (13 ऑगस्ट) 'करवा चौथ' (Karwa Chauth) हा सण देशभरात साजरा केला जाणार आहे.  करवा चौथला करक चतुर्थी असेही म्हटले जाते. विवाहित स्त्रियांव्यतिरिक्त अविवाहित मुलीदेखील (ज्यांचे लग्न निश्चित झाले आहे) या दिवशी निर्जल उपवास करतात. आणि चंद्राकडे पाहून उपवास सोडण्याची प्रथा आहे. काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये हा सण अगदी खास पद्धतीनं दाखवण्यात आला आहे. करवा चौथ हा सण अनोख्या पद्धतीने साजरा करणारे बॉलिवूड चित्रपट कोणते?  ते जाणून घेऊयात...

कभी खुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham)
कभी खुशी कभी गम या चित्रपटातील बोले चुडीया हे गाणं आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. या गाण्यात करीना कपूर, हृतिक रोशन, काजोल, शाहरुख खान हे सर्व जण 'करवा चौथ' हा सण साजरा करताना दिसत आहेत. अगदी खास पद्धतीनं या चित्रपटात करवा चौथ सण दाखवण्यात आला आहे. 

18:15 PM (IST)  •  12 Oct 2022

Mili: जान्हवी कपूरच्या मिली चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज

Mili: जान्हवी कपूरच्या  (Janhvi Kapoor) मिली चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे. हा लूक जान्हवीनं सोशल मीडियावर शेअर केला. 'एक तासात तिचं आयुष्य बदलते' असं कॅप्शन जान्हवीनं 'मिली' (Mili)चा लूक शेअर करुन दिलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor)

15:53 PM (IST)  •  12 Oct 2022

Double XL Trailer: हुमा आणि सोनाक्षीच्या 'डबल एक्‍सएल'मध्ये शिखर धवन साकारणार भूमिका; ट्रेलर पाहिलात?

Double XL Trailer:  सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि हुमा कुरेशी (Huma Qureshi) यांच्या  'डबल एक्सएल' (Double XL) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये क्रिकेटर शिखर धवन देखील दिसत आहे. 4 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

15:42 PM (IST)  •  12 Oct 2022

36 Gunn Trailer: 'गुण जुळणं ही लग्न जुळण्याची पहिली पायरी'; '36 गुण' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

36 Gunn Trailer: लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असे आपल्याकडे म्हणतात. ग्रह-तारे, पत्रिका, एका भेटीतच साताजन्माच्या गाठी बांधणे वगैरे या सगळयाच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची सुरुवात करीत असताना कुंडलीपेक्षा एकमेकांची मतं जुळणं महत्त्वाचं असतं हा विचार मांडणारा समित कक्कड दिग्दर्शित '36 गुण' (36 Gunn) मराठी चित्रपट 4 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लॉच सोहळा नुकताच संपन्न झाला. संतोष जुवेकर आणि पूर्वा पवार यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात पुष्कर श्रोत्री, विजय पाटकर, वैभव राज गुप्ता, स्वाती बोवलेकर हे कलाकार आहेत.

पाहा ट्रेलर: 

14:44 PM (IST)  •  12 Oct 2022

Badshah: बादशाह पुन्हा पडलाय प्रेमात? पंजाबी अभिनेत्रीसोबत डेटिंगच्या चर्चा

बादशाहच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री? 
बादशाह आणि अभिनेत्री ईशा रिखी (Isha Rikhi) यांच्या नात्याबाबात सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात आहे.दोघांची ओळख एका कॉमन फ्रेंडद्वारे झाली.  त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली, अशी चर्चा सध्या सुरु आहे. 2012 पासून ईशा ही अभिनयक्षेत्रात काम करत आहे. 2018 मध्ये रिलीज झालेल्या नवाबजादे या चित्रपटात ईशानं प्रमुख भूमिका साकारली. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Isha Rikhi (@isharikhi)

13:18 PM (IST)  •  12 Oct 2022

Bigg Boss Marathi 4: अक्षयची बिग बॉसकडे अजब मागणी; घरच्या आठवणीमुळे अमृताला अश्रू अनावर, बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये काय होणार?

Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील शो   'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या सीझनमध्ये प्रेक्षकांना स्पर्धकांची भांडणं, टास्क आणि ड्रामा हे सर्व बघायला मिळत आहे. नुकत्याच एका एपिसोडमध्ये अक्षय केळकरनं एक अजब मागणी केली आहे. तर अमृता धोंगडेला कुटुंबाची आठवण आल्यानं अश्रू अनावर झाले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarnage Parbhani : मनोज जरांगेेंचा परभणीत प्रवेश, शांतता रॅली मराठ्यांची गर्दीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 07 July 2024Worli Hit and Run Case : वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी बारमध्ये पार्टी करायला गेला होताMihir Shah Worli Hit and Run:आरोपी मिहिर शाहाने मद्यप्राशन केलं होतं; 18 हजारांचं बिल'माझा'च्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
पावसाळी पिकनिक, घाटातील मजामस्ती आली अंगलट; पोलिसांची वाहनधारकांवर कारवाई
Pune Crime : पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
पिंपरी चिंचवडमध्ये बांगलादेशी घुसखोरांचा अन् बनावटगिरीचा उच्छाद; तब्बल 42 भारतीय पासपोर्ट रद्द!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
वरळी हिट अँड रन: 4 मित्रांसोबत आला, एक-एक बिअर प्यायले, 18 हजारांचं बिल;  बार मालकाने A टू Z सांगितलं!
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
ते हौशे, नवशे, गवशे असतात; शरद पवारांचा अजित दादांना टोला, रशियन महिलेचा किस्सा सांगितला
Kolhapur News : शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
शाॅक लागून दोन तरण्याबांड मुलांच्या मृत्यूनंतर आईनं देखील पाचव्या दिवशी घेतला अखेरचा श्वास; अख्ख कुटुंब उद्ध्वस्त
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
'उद्धव ठाकरे, शरद पवारांवर आरोप करा, अन्...'; अनिल देशमुखांचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
Embed widget