प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; अमृता प्रीतम यांच्याशी होते खास कनेक्शन

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 22 Dec 2023 06:30 PM
Vin Diesel: हॉलिवूड स्टार विन डिझेलवर लैंगिक छळाचा आरोप; असिस्टंट म्हणाली, "त्यानं हॉटेलच्या रुममध्ये बोलवलं आणि..."
Vin Diesel Accused of Sexual Assault: विन डिझेलवर आस्टा जॉन्सनने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिनं विन डिझेलवर  अनेक गंभीर आरोप केले आहेत. Read More
प्रसिद्ध कवी आणि चित्रकार इमरोज यांचे निधन; अमृता प्रीतम यांच्याशी होते खास कनेक्शन
Imroz And Amrita Pritam: इमरोज (Imroz) यांनी वयाच्या 97 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. Read More
Salaar Review: चित्रपट बघाताना कधी बाहुबली तर कधी केजीएफची आठवण येईल; कसा आहे प्रभासचा 'सालार' ? वाचा रिव्ह्यू
Salaar Review: सालार या चित्रपटाची कथा दमदार वाटत नाही, चित्रपट अ‍ॅक्शन सीन्सनं भरलेला आहे. Read More
Oscars 2024 Shortlist: '2018' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर; कोणत्या चित्रपटांना करण्यात आलं शॉर्टलिस्ट, पाहा यादी
Oscars 2024 Shortlist: यंदा ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेली अधिकृत प्रवेशिका '2018' हा चित्रपट अकादमी पुरस्काराच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतातील प्रेक्षक नाराज झाले आहेत. Read More
Salaar Online Leaked: प्रभासच्या 'सालार'ला पायरसीचा फटका; रिलीज झाल्यानंतर काही तासातच ऑनलाईन लीक!
Salaar Online Leaked: रिलीजच्या पहिल्याच दिवशी 'सालार' (Salaar) या चित्रपटाला पायरसीचा फटका बसला आहे. प्रभासचा हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच ऑनलाइन लीक झाला आहे.  Read More
VIDEO: भाईजान स्टेजवर आला, अमिताभ बच्चन यांची गळाभेट घेतली, अभिषेकला पाहताच...; व्हिडीओची सर्वत्र चर्चा
आनंद पंडित (Anand Pandit) यांच्या बर्थ-डे पार्टीला अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सलमान खान (Salman Khan) या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीतील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. Read More
Salaar Twitter Review: कुणी म्हणाला, "ब्लॉकबस्टर" तर कुणी म्हणतंय, "अंगावर शहारे आले", प्रभासचा सालार प्रेक्षकांची मनं जिंकतोय; वाचा रिव्ह्यू
Salaar Twitter Review: अनेक नेटकऱ्यांनी सालार (Salaar) हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा रिव्ह्यू सोशल मीडियावर शेअर केला आहे. जाणून घेऊयात प्रभासच्या सालार चित्रपटाचा ट्विटर रिव्ह्यू... Read More
Dunki Box Office Collection Day 1: बॉक्स ऑफिसवर किंग खानच्या 'डंकी'चा डंका; जाणून घ्या पहिल्या दिवसाचं कलेक्शन
Dunki Box Office Collection Day 1: . शाहरुखच्या डंकी या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी किती कोटींची ओपनिंग केली आहे? ते  जाणून घेऊया... Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Bollywood Actors : शाहरुख ते रणवीर; 'या' बॉलिवूडकरांनी स्वत:च्याच पायावर मारुन घेतली कुऱ्हाड; ब्लॉकबस्टर सिनेमांना दिलेला नकार


Bollywood Actors : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या सिनेमांमुळे चांगलेच चर्चेत असतात. एखादा सिनेमा निवडताना सेलिब्रिटी खूप विचार करतात. पण कधीकधी त्यांचा निर्णय चुकतो. शाहरुख खान, (Shah Rukh Khan) रणवीर सिंहसह (Ranveer Singh) अनेक सेलिब्रिटींनी स्वत: च्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली आहे. ब्लॉकबस्टर आणि सुपरहिट ठरलेले सिनेमे कलाकारांनी रिजेक्ट केले होते.


Koffee With Karan 8 : राणी मुखर्जी अन् काजोलमध्ये होता अबोला; 'या' कारणाने कमी झाला दुरावा


Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) या कार्यक्रमात काजोल (Kajol) आणि राणी मुखर्जी (Rani Mukerji) सहभागी झाले होते. काजोल आणि रानी मुखर्जी या बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत बहिणीदेखील आहेत. नुकताच करण जोहरच्या (Karan Johar) 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमाचा लेटेस्ट एपिसोड समोर आला आहे. यात काजोल आणि रानी या इंडस्ट्रीतील अभिनेत्री मनोरंजनसृष्टी ते वैयक्तिक आयुष्यासंबंधित अनेक गोष्टींवर भाष्य करताना दिसत आहेत. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या कार्यक्रमात काजोल आणि राणी मुखर्जी यांनी त्यांच्यात आलेल्या दुराव्याबद्दल भाष्य केलं आहे. काजोल म्हणाली की,"आम्ही एकमेकींसोबत बोलत नव्हतो, अशी एक वेळ होती. आमच्यात भांडण झालंय असंही काही नव्हतं. पण आपापल्या कामात आम्ही व्यस्त होतो. त्यामुळे आमचा एकमेकींसोबत संवाद होत नव्हता". 


Akshay Kelkar : 'बिग बॉस मराठी'चा विजेता अक्षय केळकरला लागलं म्हाडाचं घर; म्हणाला,"चमचमणारी मुंबई आता घरबसल्या पाहणार"


Akshay Kelkar : मुंबईसारख्या शहरात स्वत:चं घर होणं हे अनेकांचं स्वप्न असतं. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटी मंडळींपर्यंत सर्वच जण स्वत:चं घर होण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वाचा विजेता (Bigg Boss Marathi 4 Winner) अक्षय केळकरसाठी (Akshay Kelkar) हे वर्ष खूपच खास आहे. एकीकडे वर्षाच्या सुरुवातीला तो 'बिग बॉस मराठी 4'चा विजेता झाला. तर दुसरीकडे वर्षाच्या शेवटी मुंबईत त्याला म्हाडाचं घर लागलं आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.