(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Salaar Review: चित्रपट बघाताना कधी बाहुबली तर कधी केजीएफची आठवण येईल; कसा आहे प्रभासचा 'सालार' ? वाचा रिव्ह्यू
Salaar Review: सालार या चित्रपटाची कथा दमदार वाटत नाही, चित्रपट अॅक्शन सीन्सनं भरलेला आहे.
प्रशांत नील
प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन, श्रुती हासन, जगपती बाबू
Salaar Review: 'सालार' (Salaar) हा चित्रपट आज रिलीज झाला आहे. प्रभाससोबतच (Prabhas) सालार या चित्रपटामध्ये पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran), श्रुती हासन (Shruti Haasan) आणि जगपती बाबू (Jagapathi Babu) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातील सर्व पात्रांनी आपापल्या भूमिकेला न्याय दिला आहे, तरीही कथा दमदार वाटत नाही, चित्रपट अॅक्शन सीन्सनं भरलेला आहे.
चित्रपटाचे कथानक
सालार चित्रपटाची कथा दोन मित्रांवर आधारित आहे जे आता शत्रू बनले आहेत. देवा आणि वर्धा व्यतिरिक्त चित्रपटात टॅटू हे नाव सर्वाधिक ऐकू येते.त्यानंतर चित्रपटात श्रुती हसनची एन्ट्री होते. चित्रपटाच्या कथेची मुख्य गोष्ट म्हणजे खानसार, जिथे सर्व गुन्हेगार राहतात. इथल्या लोकांचं जग खूप वेगळं आहे.चित्रपटाची कथा उग्रामपासून सुरू होऊन मध्यंतरापर्यंत केजीएफपर्यंत जातो हे बघताना तुम्हाला कंटाळा येतो, त्यानंतर मुख्य कथा सुरू होते. चित्रपटाच्या प्रत्येक सीनमध्ये अॅक्शन आहे. दिग्दर्शक प्रशांत नीलचे हे जग आता तुम्हाला बाहुबलीची आठवण करुन देईल.
चित्रपटगृहांमध्ये प्रभासची जादू पाहायला मिळत आबे, चित्रपट बघायला लोकांची गर्दी झाली. अॅक्शनप्रेमींनीही चित्रपट बघताना शिट्ट्या वाजवल्या. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार आहे, ज्याचा पहिला भाग सालार: भाग 1 द सीझफायर प्रदर्शित झाला आहे. आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची वाट पाहत आहेत.हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.
कलाकारांचा अभिनय
प्रभास आणि पृथ्वीराज सुकुमारनचा लूक वेगळा नाही, त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांचा हा लूक पाहिला असेल. चित्रपटात श्रुती हसन देखील आहे, तिची भूमिका चित्रपटाच्या पूर्वार्धात जास्त आहे. एकंदरीत चित्रपटातील कलाकारांचा अभिनय चांगला आहे, श्रिया रेड्डीने देखील चांगले काम केले आहे. जगपती बाबूची भूमिका छोटी आहे पण ती प्रभावी आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन
दाक्षिणात्य चित्रपटांचे दिग्दर्शन नेहमीच चांगले असते. सालार चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांचे दिग्दर्शन चांगले आहे, कथेत ज्या जगाबद्दल बोलले जात आहे, त्याच्या लोकेशनपासून ते दिग्दर्शनापर्यंत, तुम्हाला चित्रपटात संपूर्ण अनुभव मिळेल. चित्रपटाचे दिग्दर्शन पॉवर फुल आहे.
चित्रपटाचे म्युझिक
'सालार' चित्रपटाचे पहिले गाणे 'सूरज ही छाव बनके' रिलीज होताच हिट ठरले. निर्मात्यांनी या गाण्याचा एक लिरिकल व्हिडीओ रिलीज केला होता. या गाण्याच्या हिंदी व्हर्जनला रिलीज झाल्याच्या अवघ्या 11 तासांत 14 लाख 42 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले . हे गाणे मेनुका पोडले यांनी गायले आहे आणि रवी बसरूर यांनी दिग्दर्शित केले आहे. गाण्याचे बोल रिया मुखर्जीने लिहिले आहेत. या गाण्याशिवाय चित्रपटाचे संगीत तुम्हाला खिळवून ठेवते.
Overall Review: प्रभासच्या नावाने चित्रपटाची तिकीटं विकली जात आहेत आणि गर्दीही पोहोचतेय, अॅक्शनसाठी चित्रपट बघू शकता पण मनोरंजनाच्या बाबतीत चित्रपट थोडा वीक वाटतो.