Vin Diesel: हॉलिवूड स्टार विन डिझेलवर लैंगिक छळाचा आरोप; असिस्टंट म्हणाली, "त्यानं हॉटेलच्या रुममध्ये बोलवलं आणि..."
Vin Diesel Accused of Sexual Assault: विन डिझेलवर आस्टा जॉन्सनने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तिनं विन डिझेलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
Vin Diesel Accused of Sexual Assault: 'फास्ट अँड फ्युरियस' फेम अभिनेता विन डिझेल (Vin Diesel) सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. विन डिझेलवर त्याची माजी सहाय्यक असिस्टंट आस्टा जॉन्सनने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आस्टा जॉन्सनने गुरुवारी लॉस एंजेलिसमध्येही गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीत आस्टाने विन डिझेलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
विन डिझेलवर आस्टा जॉन्सनने केले गंभीर आरोप
2010 मध्ये अटलांटा येथे फास्ट फाइव या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विन डिझेलनं लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आस्टा जॉन्सनने केला आहे. आस्टा जॉन्सनने सांगितले की, ती त्यावेळी त्याच्यासोबत काम करायची आणि तिथे सर्व काही मॅनेज करायटी. शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर विन डिझेलने तिला हॉटेलच्या रूममध्ये बोलावले. आत आल्यानंतर विनने तिच्यासमोर अश्लील कृत्य केले.
आस्टा जॉन्सनने असेही सांगितले आहे की, विन डिझेलनं तिच्यावर अनेकदा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. पण 2010 मध्ये या विननं सर्व मर्यादा ओलांडल्या. जॉन्सनने सांगितले की, "विन डिझेल क्लब पार्टीतून परतला होता आणि खोलीत गेल्यावर त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. विनने बेडवर ओढले. जॉन्सनने तक्रारीत सांगितले की, डिझेलने तिला इतके घट्ट पकडले होते की तिला पळून जाणेही शक्य नव्हते.
आस्टा जॉन्सनने तक्रारीत असेही म्हटले आहे की, जेव्हा डिझेलने तिचे अंतर्वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती किंचाळली. पण यादरम्यान तिला भीतीही वाटत होती की जर ती विन डिझेलच्या विरोधात गेली तर तिला नोकरीतून काढून टाकले जाईल. पण ती कशीतरी तिथून निसटली.
विन डिझेलसोबत दीपिकासोबत शेअर केलीये स्क्रिन
दीपिका पदुकोणने विन डिझेलसोबत XXX या चित्रपटात काम केलं आहे.'द एलेन डिजेनर्स शो' या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने विन डीजलबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती की,"मी विन डीजलची मोठी चाहती असून त्याच्या मुलाची आई होण्याचाही मी विचार केला होता"
View this post on Instagram
संबंधित बातम्या