Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना गोंदियामध्ये घडलीये. गोंदियाच्या नवेगावबांध पोलीस स्टेशन हद्दीतील धाबेपवनी AOP मध्ये ही घटना घडलीये. पोलीस कर्मचाऱ्याच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, कर्माचाऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.   






तिरोडा पोलीस स्टेशन येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा 


अधिकची माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागामध्ये नक्षल गतीविधीवर नजर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात AOP बांधण्यात आल्या आहेत. अशातच नवेगावबांध पोलीस स्टेशन जवळ असलेल्या धाबेपवनी येथील AOP सेंटर मधील हवालदार तेजराम कोरोटी यांनी आत्महत्या केल्याने एकच खडबड उडाली आहे. त्यांनी आपल्याजवळ असलेल्या बंदूकाने गोळी झाडत आत्महत्या केली... पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या का केली हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मात्र त्यांची ट्रान्सफर तिरोडा पोलीस स्टेशन येथे झाल्याने त्यांनी आत्महत्या केली, असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे....


मुळव्याधाच्या त्रासाने त्रस्त रिक्षाचालकाची गळफास घेऊन आत्महत्या


भिवंडीतील शांतीनगर भागात राहणाऱ्या 40 वर्षीय फैजान शहा मोहम्मद मोमीन यांनी मुळव्याधाच्या असह्य त्रासामुळे गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. फैजान मागील 18-20 वर्षांपासून रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होते. सतत रिक्षा चालवल्यामुळे त्यांना मुळव्याधाचा त्रास सुरू झाला. त्यांनी या त्रासातून सुटका करण्यासाठी अनेक डॉक्टरांकडे उपचार घेतले, परंतु उपचारानंतरही त्रास कायम राहिला. या असह्य वेदनांनी त्रस्त होऊन त्यांनी मुंबई नाशिक महामार्गाच्या किनारी  पिंपळास गावाजवळील एका लोखंडी होल्डिंगला गळफास लावून आत्महत्या केली.






इतर महत्त्वाच्या बातम्या


8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्याला 1 लाख पगार असेल तर 8 व्या वेतन आयोगानुसार त्यात किती हजारांची वाढ होणार? जाणून घ्या सोप्या शब्दात


Ladki Bahin Yojana Maharashtra : लाडक्या बहिणीचा जानेवारीचा हफ्ता मिळण्याची तारीख ठरली, 'या' दिवशी 1500 रुपये खात्यावर जमा होणार