Kadak Singh Trailer: एक घटना, चार कथा, पण सत्य काय? पंकज त्रिपाठींच्या 'कडक सिंह' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 21 Nov 2023 04:44 PM
Shahid Kapoor: इफ्फीमध्ये परफॉर्म करताना स्टेजवर अचानक कोसळला शाहिद; पुढे काय घडलं?
शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) सोमवारी (20 नोव्हेंबर) गोव्यात आयोजित 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2023 (IFFI) च्या उद्घाटन सोहळ्यात परफॉर्म केलं. Read More
Kadak Singh Trailer: एक घटना, चार कथा, पण सत्य काय? पंकज त्रिपाठींच्या 'कडक सिंह' चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज
Kadak Singh Trailer: काही दिवसांपूर्वी पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) यांच्या 'कडक सिंह' या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More
Bigg Boss 17 : 'बिग बॉस'च्या घरात राखी सावंतची वाइल्ड कार्ड एन्ट्री? घरातील स्पर्धकांचं जगणं होणार मुश्किल
Rakhi Sawant : अभिनेत्री राखी सावंतची 'बिग बॉस 17'च्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे. Read More
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी 'या' मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत शेअर करणार स्क्रिन; आगामी प्रोजेक्टची केली घोषणा
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन हा लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या प्रोजेक्टमध्ये तो एका मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.  Read More
Mansoor Ali Khan Comment: 'बेडरूम सीन करण्याची संधी मिळेल असं वाटलं होतं'; अभिनेत्याचं वक्तव्य, अख्ख्या साऊथ इंडस्ट्रीचा त्रिशाला पाठिंबा
सध्या मन्सूर अली खान (Mansoor Ali Khan) हा त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. त्याच्या वक्तव्यावर दाक्षिणत्य चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. Read More
Sayali Sanjeev : 'काहे दिया परेदस' मालिकेतील शिव-गौरीची जोडी पुन्हा एकत्र दिसणार; सायली संजीव अन् ऋषी सक्सेना 'या' सिनेमात दिसणार मुख्य भूमिकेत
Sayali Sanjeev Rishi Saxena : अभिनेत्री सायली संजीव आणि ऋषी सक्सेनाची जोडी 'समसारा' या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Dhanush: धनुषच्या लेकाला पोलिसांनी ठोठावला दंड; नेमकं प्रकरण काय?
Dhanush: धनुषच्या मुलाला पोलिसांनी दंड ठोठावला आहे. नेमकं प्रकरण काय आहे? हे जाणून घेऊयात Read More
Singham 3 : 'सिंघम 3'मधील बाजीराव सिंघमचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट; बॉक्स ऑफिस गाजवायला अजय देवगन सज्ज
Ajay Devgn : 'सिंघम 3' सिनेमातील अजय देवगनचा अंगावर शहारे आणणारा लूक आऊट झाला आहे. Read More
Sara Ali Khan : "आझाद आवाजें, कैद नहीं होती", सारा अली खानच्या 'ए वतन मेरे वतन'चं मोशन पोस्टर आऊट!
Sara Ali Khan : अभिनेत्री सारा अली खानच्या आगामी 'ए वतन मेरे वतन' या सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट झालं आहे. Read More
Salman Khan on Tiger 4 : वर्ल्ड कप फायनल दरम्यान सलमानने दिली 'टायगर 4'ची हिंट; भाईजान म्हणाला,"प्रतीक्षा करा"
Salman Khan : सलमान खानने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यादरम्यान 'टायगर 4' (Tiger 4) सिनेमाबद्दल भाष्य केलं आहे. Read More
International Emmy Awards 2023 : आंतरराष्ट्रीय पातळीवर विनोदवीर वीर दासने रोवला भारताचा झेंडा; एमी पुरस्कारावर कोरलं नाव
Vir Das : अभिनेता आणि विनोदवीर वीर दासला 'एमी पुरस्कार 2023' जाहीर झाला आहे. Read More
Ankita Lokhande : सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला अंकिता लोखंडे का गेली नव्हती? 'Bigg Boss'च्या घरात अभिनेत्रीने सांगितलं कारण
Anikita Lokhande Sushant Singh Rajput : सुशांत सिंह राजपूतच्या अंत्यसंस्काराला अंकिता लोखंडे गेली नव्हती. आता 'बिग बॉस'च्या (Bigg Boss 17) घरात अभिनेत्रीने यामागचं कारण सांगितलं आहे. Read More
Movie Release in December 2023 : शाहरुखचा 'Dunki' ते प्रभासचा 'Salaar'; वर्षाचा शेवट होणार धमाकेदार! डिसेंबरमध्ये रिलीज होणार 'हे' सिनेमे
Bollywood Movies Release in December : डिसेंबर महिन्यात अनेक सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. या सिनेमांची सिनेरसिक आतुरतेने वाट पाहत आहेत. Read More
Shubman Gill Crush : शुभमन गिलची क्रश Sara Tendulkar नाही; 'या' लोकप्रिय अभिनेत्रीवर क्रिकेटर फिदा
Shubman Gill : टीम इंडियाचा क्रिकेटर शुभमन गिल अनेकदा सारा तेंडुलकरमुळे (Sara Tendulkar) चर्चेत असतो. पण क्रिकेटर मात्र बॉलिवूडच्या एका वेगळ्याच अभिनेत्रीवर फिदा आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


12th Fail And Tejas Box Office Collection: विक्रांत मेस्सीच्या '12th फेल' नं केली बंपर कमाई; कंगनाच्या 'तेजस' ला टाकलं मागे; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन....


12th Fail And Tejas Box Office Collection: अभिनेता विक्रांत मेस्सीचा (Vikrant Massey) '12th फेल' (12th Fail) या चित्रपटाची आणि अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) 'तेजस' (Tejas) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली होती. हे दोन्हीही चित्रपट 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये रिलीज झाले. '12th फेल' आणि  'तेजस' या चित्रपटांना रिलीज होऊन पाच दिवस झाले आहेत. जाणून घेऊयात या चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...विक्रांत मेस्सीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन  '12th फेल'  या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती दिली आहे. ज्यानुसार,  '12th फेल'   या चित्रपटानं  शुक्रवारी (27 ऑक्टोबर) बॉक्स ऑफिसवर  1.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर शनिवारी या चित्रपटानं 2.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. तसेच रविवारी आणि सोमवारी या चित्रपटानं 3.10 आणि 1.50 कोटींचे कलेक्शन केलं आहे. आता पाचव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी हा चित्रपट 1.60 कोटी एवढी कमाई करेल, असा अंदाज लावला जात आहे. पण चार दिवसात या चित्रपटानं 8.20 कोटी एवढे कलेक्शन केलं आहे.


Indian Police Force: सिद्धार्थ मल्होत्रासोबत वेब सीरिजमध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; फोटो शेअर करत म्हणाला, "चेस सीननंतर..."


Indian Police Force:  अभिनेता  सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) हा लवकरच  इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force)  या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थसोबतच या वेब सीरिजमध्ये  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) हे कलाकार  देखील प्रमुख भूमिका साकरणार आहे. आता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थसोबत एक मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. कोणता मराठमोळा अभिनेता  इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये काम करणार आहे? याबाबत जाणून घेऊयात...


 अभिनेता आदिश वैद्य हा इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. नुकताच आदिशनं सिद्धार्थसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "या स्टारबॉयसोबत काम करताना खूप आनंद झाला.  लांब धावण्याच्या चेस सीन नंतर क्लिक केलेला हा फोटो" आता इंडियन पोलीस फोर्स या वेब सीरिजमध्ये आदिशचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.