Jawan Ticket Price : 'जवान'ची बंपर ऑफर; फक्त 60 रुपयांत थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 05 Sep 2023 05:08 PM
Telly Masala : 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमामध्ये अभिजीत बिचुकले लावणार हजेरी ते 'तीन अडकून सीताराम' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...
Telly Masala : मराठी मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या जाणून घ्या... Read More
Jawan Ticket Price : 'जवान'ची बंपर ऑफर; फक्त 60 रुपयांत थिएटरमध्ये पाहता येणार चित्रपट
Jawan Movie : शाहरुखचा 'जवान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More
800 Trailer: मुथय्या मुरलीधरनचे आयुष्य उलगडणार रुपेरी पडद्यावर; 800 चा ट्रेलर रिलीज, स्लमडॉग मिलेनियर फेम मधुर मित्तल प्रमुख भूमिकेत
800  Trailer: 800 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधील मधुर मित्तलच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत. Read More
Khupte Tithe Gupte: अवधूत गुप्तेच्या धारदार प्रश्नांना उत्तरं देणारा अभिजीत बिचुकले; 'खुपते तिथे गुप्ते' कार्यक्रमाचा प्रोमो व्हायरल
अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) हे आता  'खुपते तिथे गुप्ते'  (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमामध्ये अवधूत गुप्तेच्या प्रश्नांची कशी उत्तरं देणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. Read More
Rajkumar Rao : राजकुमार राव पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार; म्हणाला,"गव्हाच्या पिठाची बाप्पाची मूर्ती अन्..."
Kalavantancha Ganesh : राजकुमार राव (Rajkumar Rao) यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणार आहे. Read More
Amitabh Bachchan : भारत माता की जय! G-20 निमंत्रण पत्रिकेवरील नाम बदलावर अमिताभ बच्चन यांचं सूचक ट्वीट
Amitabh Bachchan Tweet : 'भारत माता की जय' असं म्हणत अमिताभ बच्चन यांनी सूचक ट्वीट केलं आहे. Read More
Teen Adkun Sitaram : 'मासे असो वा माणसे, व्यवस्थित जाळं टाकलं तर...'; 'तीन अडकून सीताराम' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Teen Adkun Sitaram : 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Sachin Sawant: IRS अधिकारी सचिन सावंत यांनी कोची येथे 15-20 वेळा मल्याळम अभिनेत्री नव्या नायरची भेट घेतली: ईडी
सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी नव्या नायरची (Navya Nair) कोची (Kochi) येथे 15-20 वेळा भेट घेतली असं, असा आरोप ईडीनं केला आहे. Read More
Shah Rukh Khan: दिग्दर्शक ॲटलीच्या आईला पाहिल्यानंतर शाहरुखनं केलं असं काही; नेटकरी म्हणाले, 'म्हणूनच त्याला किंग खान म्हणतात', व्हिडीओ व्हायरल
Shah Rukh Khan: नुकताच सोशल मीडियावर शाहरुखचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. Read More
Vijay Deverakonda: साऊथ स्टार विजय देवरकोंडाची मोठी घोषणा! 100 कुटुंबांना देणार प्रत्येकी एक लाख
Vijay Deverakonda: सोमवारी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील एका कार्यक्रमात विजय देवरकोंडानं  हजेरी लावली. या कार्यक्रमात विजयनं मोठी घोषणा केली आहे. Read More
Lalit Modi Dating Ujjwala Raut : ललित मोदीच्या प्रेमाचा नवा अध्याय सुरू; सुष्मिता सेनसोबतच्या ब्रेकअपनंतर 'या' मॉडेलला करतोय डेट; फोटो व्हायरल
Lalit Modi Viral Photo : सुष्मिता सेनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ललित मोदी आता मॉडेल उज्ज्वला राऊतला (Ujjwala Raut) डेट करत आहे. Read More
Urmila Nimbalkar: 'मी आरशात बघून स्वत:ला मारायचे', उर्मिला निंबाळकर डिप्रेशनबाबत भरभरुन बोलली; म्हणाली, 'मला मालिकेतून काढून टाकलं होतं...'
Urmila Nimbalkar: उर्मिलानं 'मला आलेलं डिप्रेशन ते एक मिलियन' हा व्हिडीओ तिच्या युट्यूब चॅनलवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून उर्मिलानं तिला आलेल्या डिप्रेशनबाबत सांगितलं. Read More
Teacher's Day 2023: बोमन इराणी ते अर्चना पूरन सिंह; 'या' कलाकांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या शिक्षकाच्या भूमिकेनं जिंकलं प्रेक्षकांचे मन!
Teacher's Day 2023: अनेक बॉलिवूडमधील कलाकारांनी रुपेरी पडद्यावर शिक्षकाची भूमिका साकारली आहे. जाणून घेऊयात अशा कलाकारांबद्दल ज्यांनी रुपेरी पडद्यावर साकारलेल्या शिक्षकाच्या भूमिकेनं प्रेक्षकांची मन जिंकली... Read More
Hema Malini : "झुला झुले राधा रानी"... गोकुळाष्टमीनिमित्त हेमा मालिनींचं खास भजन; म्हणाल्या,"गायिका नसूनही..."
Hema Malini : गोकुळाष्टमीनिमित्त (Janmashtami) हेमा मालिनी यांनी खास भजन गायलं आहे. Read More
Gautami Patil : गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन; धुळ्यात सापडलेले बेवारस अवस्थेत
Gautami Patil : नृत्यांगणा गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन झाले आहे. Read More

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sangeet Devbabhali : 'संगीत देवबाभळी'चा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या बी. ए. अभ्यासक्रमात समावेश


भद्रकाली प्रॉडक्शन्सच्या इन्स्टाग्रामवर पेजवर एक खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे, "भद्रकाली प्रॉडक्शन्स"च्या प्राजक्त देशमुख लिखित 'संगीत देवबाभळी' या मराठी रंगभूमीवरील माईलस्टोन नाटकाचा या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील बी.ए. मराठी भाग 2 सत्र 3 च्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. प्राजक्त देशमुख चे मनःपूर्वक अभिनंदन!" या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी 'संगीत देवबाभळी' नाटकाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 


Sukh Mhanje Nakki Kay Asta: ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या प्रोमोला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, 'दु:खा म्हणजेच हेच असतं...'


Sukh Mhanje Nakki Kay Asta: "सुख म्हणजे नक्की काय असतं" (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या छोट्या पडद्यावरील मराठी मालिके वेगवेगळे ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या नुकत्याच शेअर करण्यात आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, शालिनी, देवकी आणि मल्हार हे जयदीपला एका खड्यात पुरताना दिसत आहेत. त्यानंतर गौरी बाप्पाकडे प्रार्थना करत म्हणते, 'बाप्पा जयदीपला माझ्यापासून लांब घेऊन जाऊ नको.' यावर एक चिमुकली गौरीला म्हणते, 'बप्पाचा उंदीर मामा आहे ना तुला मार्ग दाखवायला' त्यानंतर प्रोमोमध्ये एक उंदीर दिसतो.  'बाप्पाचा उंदीर मामा दाखवणार गौरीला जयदीपपर्यंत पोहोचण्याचा मार्ग... 'सुख म्हणजे नक्की काय असतं !' असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं आहे.


Jawan Trailer: जबरदस्त डायलॉग्स, अॅक्शन सीन्स आणि किंग खानचे वेगवेगळे लूक्स; 'जवान' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज


Jawan Trailer Release:  अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमध्ये शाहरुख हा विविध लूक्समध्ये दिसत आहे.  तसेच या ट्रेलरमधील डायलॉग्स  आणि अॅक्शन सीन्स यांनी अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी कमेंट्स करुन ट्रेलरमधील शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.