एक्स्प्लोर

Vijay Deverakonda: साऊथ स्टार विजय देवरकोंडाची मोठी घोषणा! 100 कुटुंबांना देणार प्रत्येकी एक लाख

Vijay Deverakonda: सोमवारी विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथील एका कार्यक्रमात विजय देवरकोंडानं  हजेरी लावली. या कार्यक्रमात विजयनं मोठी घोषणा केली आहे.

Vijay Deverakonda: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) खुशी (Kushi) हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटामधील विजयच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. सोमवारी विशाखापट्टणम  (Visakhapatnam)  येथील एका कार्यक्रमात विजय देवरकोंडानं  हजेरी लावली. या कार्यक्रमात विजयनं मोठी घोषणा केली आहे.

नुकताच विशाखापट्टणम येथील कार्यक्रमामधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की विजय म्हणतो, 'माझा आनंद तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी मी 100 कुटुंबांमध्ये एक कोटी रुपयांचे वाटप करण्याची घोषणा करत आहे. 100 कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार आहे.' व्हिडीओमध्ये विजय हा तेलुगु भाषेत बोलताना दिसत आहे. विजयनं ही घोषणा करताच प्रेक्षक टाळ्यांचा कडकडाट करतात, असं व्हिडीओमध्ये दिसते.

फिल्म ट्रेड विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी विजयच्या घोषणेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. विजय हा 100 कुटुंबांना प्रत्येकी एक लाख रुपये येत्या दहा दिवसात देणार आहे, असं म्हटलं जात आहे.

पाहा व्हिडीओ:

खुशी चित्रपटाची स्टार कास्ट

खुशी या चित्रपटानं ओपनिंग-डेला जवळपास  16 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन शिव निर्वाण यांनी केले आहे. या चित्रपटातील विजय आणि  समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटामध्ये विजय आणि  समंथा यांच्यासोबतच  सचिन खेडेकर, सरन्या पोनवन्नन, मुरली शर्मा, लक्ष्मी जयराम आणि रोहिणी यांच्याही भूमिका आहेत. खुशी हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज झाला आहे.  30 कोटींच्या बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे.

विजय देवरकोंडाचे चित्रपट

विजय देवरकोंडा हा साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचा  'लायगर' हा हिंदी चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. तसेच विजयनं  अर्जुन रेड्डी, महानती,गीता गोविंदम या  तेलुगु चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विजयच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघत असतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Kushi Review : विजय देवरकोंडा आणि समंथाचा 'खुशी' कसा आहे? वाचा रिव्ह्यू

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget