न्यूयॉर्क : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाचा कार्यभार काल स्वीकारला. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय ट्रम्प यांनी घेतला. तर, मेक्सिको आणि कॅनडावर 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय देखील ट्रम्प यांनी घेतला. याशिवाय अमेरिकेत जन्म झालेल्या प्रत्येक व्यक्तीला नागरिकत्व मिळणार नाही, यासह इतर निर्णय ट्रम्प यांनी घेतले आहेत. अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी क्रिप्टो करन्सीमध्ये दोन कॉईन जारी केले होते. $TRUMP मीम कॉईन आणि $MELANIA मीम कॉईन जारी केले होते. ट्रम्प यांना एक निर्णयाचा फटका बसल्यानं त्यांनी 7.5 अब्ज डॉलर्स गमावले.
नेमकं काय घडलं?
मेलेनिया ट्रम्प यांनी $MELANIA मीम कॉईन जारी केलं होतं. हे कॉइन 19 जानेवारीला लाँच करण्यात आलं होतं. $MELANIA मीम कॉईन लाँच होताच ते 24000 टक्केंच्या तेजीसह 13 डॉलरपर्यंत पोहोचलं होतं. त्यामुळं त्याचं बाजारमूल्य 13 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक झालं होतं. मेलेनियानं ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन लाँचिंग संदर्भातील घोषणा केली होती आणि व्यापाऱ्यांना खेरीदंच आवाहन केलं होतं.
$MELANIA मीम कॉइन लाँच झाल्यानंतर $TRUMP मीम कॉइनला मोा फटका बसला. डोनाल्ड ट्रम्प यांचं $TRUMP मीम कॉइन लाँचिंगनंतर जोरदार चर्चेत होतं. त्याच्या किमतीत 300 टक्क्यांची वाढ झाली होती. त्याचं बाजार मूल्य 14 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलं होतं. मात्र, मेलेनिया यांचं मीम कॉइन लाँच झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मीम कॉइनमध्ये 50 टक्के घसरण झालीय.
रिपोर्टनुसार $MELANIA मीम कॉइन लाँच झाल्यानंर $TRUMP मीम कॉइनमध्ये 10 मिनिटांमध्ये घसरण झाली. डोनाल्ड ट्रम्प यांना त्यामुळं साधारणपणे 7.5 अब्ज अमेरिकन डॉलर्सची घसरण झाली. गुंतवणूकदारांनी मेलेनिया ट्रम्प यांच्या मीम कॉइनला प्राधान्य दिलं.
क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करताना सावधानता महत्त्वाची
क्रिप्टो करन्सीचा बाजार अस्थिर असतो. जेव्हा नवी क्रिप्टोकरन्सी लाँच होते तेव्हा बाजारातील इतर घटकांवर परिणाम होई शकतात. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार #MELANIA मीम कॉइनकडून #TRUMP मीम कॉइनला आव्हान मिळू शकतं.
मेलेनिया ट्रम्प यांनी त्यांच्या मीम संदर्भात भाष्य केलं होतं, त्या म्हणालेल्या की हे फक्त मजेशीर पाऊल नाही, ही माझ्या संमर्थकांसाठी नवी संधी आहे. लोकांनी या क्रिप्टोकरन्सीचा भाग व्हावं, त्याला स्वीकारावं, असं वाटत असल्याचं मेलेनिया ट्रम्प म्हणाल्या. यानंतर $MELANIA मीम कॉइनची खरेदी वाढली.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)