Donald Trump : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी आयोजित केलेल्या खास डिनरला हजेरी लावली होती. त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती दिसून आल्याने सुद्धा चांगलीच चर्चा रंगली. ट्रम्प यांच्यासोबतचा फोटोही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. आता आपल्या मनात हा प्रश्न नक्कीच पडत असेल की या बड्या व्यक्तींशी संबंधित कल्पेश मेहता (Kalpesh Mehta) आहे तरी कोण?






ट्रम्प ब्रँड भारतात आणण्यात महत्त्वाचा वाटा


डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्पेशल डिनरमध्ये अंबानी दाम्पत्य इतर भारतीय उद्योजकांसोबत दिसले. यामध्ये M3M डेव्हलपर्सचे व्यवस्थापकीय संचालक पंकज बन्सल आणि कल्पेश मेहता यांचा समावेश होता. कल्पेश हे ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. ट्रम्प टॉवर्ससाठी ते परवानाधारक भारतीय भागीदार आहेत. ट्रम्प ब्रँड भारतात आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या डिनरला जगभरातील अनेक बडे उद्योगपती उपस्थित होते. हा एक अनौपचारिक कार्यक्रम होता जिथे लोक एकमेकांना भेटू शकतात आणि संवाद साधू शकतात. ट्रम्प यांच्यासाठी अमेरिकन आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी जगताशी संबंध निर्माण करण्याची ही चांगली संधी होती. कल्पेश मेहता यांनी इन्स्टाग्रामवर मुकेश आणि नीता अंबानीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे.






कोण आहे कल्पेश मेहता?


मुंबईस्थित कल्पेश मेहता हे ट्रिबेका डेव्हलपर्सचे संस्थापक आहेत. त्यांनी हौसर, लेहमन ब्रदर्स, द कार्लाइल ग्रुप आणि स्टारवुड कॅपिटल ग्रुप ग्लोबल, एलएलसी येथेही काम केले आहे. 2004-2006 मध्ये त्यांनी व्हार्टन स्कूलमधून रिअल इस्टेट आणि फायनान्समध्ये एमबीए केले. त्यांचा अनुभव रिअल इस्टेट आणि फायनान्स क्षेत्रातील आहे. Hauser, Lehman Brothers, Carlyle Group आणि Starwood Capital Group या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी स्वतःची कंपनी Tribeca Developers सुरू केली. डिनरचा फोटो शेअर करताना मेहता यांनी लिहिले, 'ट्रम्प यांच्या कार्यक्रमात नीता आणि मुकेश अंबानींसोबत.' मुकेश अंबानींनी काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर नीता अंबानी यांनी सिल्कची साडी आणि लांब ओव्हरकोट परिधान केला होता. भारतीय रिअल इस्टेट उद्योजकाने ट्रम्प यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत.


मेहता यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे ज्यामध्ये ट्रम्प पत्नी मेलानियांसोबत फटाके वाजवताना दिसत आहेत. मेहता यांनी लिहिले की, 'ट्रम्प नॅशनल स्टर्लिंग येथे मित्र आणि कुटुंबासह उद्घाटनाची अविश्वसनीय सुरुवात. 45व्या आणि 47व्या POTUS सोबत साजरे करण्याचा विशेषाधिकार मिळाला.


इतर महत्वाच्या बातम्या