Celebrity Diary : हर्षद अतकरीला आवडतात गुलाबजाम; जाणून घ्या सध्याच्या राजकारणावर तो काय म्हणाला...
Celebrity Diary : सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घ्या अभिनेता हर्षद अतकरीच्या खास गोष्टी...
![Celebrity Diary : हर्षद अतकरीला आवडतात गुलाबजाम; जाणून घ्या सध्याच्या राजकारणावर तो काय म्हणाला... Entertainment News Celebrity Diary of Harshad Atkari know with who they wants to work with next Celebrity Diary : हर्षद अतकरीला आवडतात गुलाबजाम; जाणून घ्या सध्याच्या राजकारणावर तो काय म्हणाला...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/05/29b2d407e3a8d71ad2b20456f031082c1662386098106254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Celebrity Diary : मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याबद्दल नेहमीच सर्वसामान्यांच्या मनात कुतूहल असतं. एखाद्या सेलेब्रिटी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असते. कलाकारांना मायबाप रसिकप्रेक्षकांची साथ लाभल्यामुळे त्यांच्या अभिनयाचा आलेख उंच होत जात असतो. 'सेलिब्रिटी डायरी'च्या माध्यमातून जाणून घेऊयात हर्षद अतकरीच्या (Harshad Atkari) गॅलरीतला शेवटचा स्कीनशॉटपासून त्याला कोणता रिॲलिटी शो करायला आवडेल?
'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर कोणाचं नाव समोर येतं?
- एकाचं नाव नाही घेता येणार.. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या पाच-सहा जणांचा शाळेपासूनचा आमचा एक ग्रुप आहे. या ग्रुपमधील मंडळींचं नाव समोर येतं.
कोणता रिअॅलिटी शो करायला आवडेल?
- डान्स रिअॅलिटी शो
पुढचा प्रोजेक्ट कोणता करायला आवडेल?
- नाटक खुणावतयं
भावा-बहिणीचे किंवा मैत्रीणीचे/ मित्राचे कपडे शेअर केले आहेत का?
- कधीच नाही.
स्वयंपाकातील कोणते पदार्थ बनवता येतात?
वरण-भात, अंड्याचे पदार्थ, चिकन
आवडता खाद्यपदार्थ?
- गुलाबजाम
कोणत्या लोकल ट्रान्सपोर्टने प्रवास करायला आवडतं?
- लोकल ट्रेन... कोरोनाकाळात मास्क लाऊन लोकलने प्रवास करत असताना चाहत्यांनी फक्त डोळ्यांनी ओळखलं आहे.
सध्याच्या राजकारणावर एक शब्द -
माईंड गेम
हर्षद अतकरीबद्दल जाणून घ्या...
हर्षद अतकरी हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता आहे. त्याने 'दूर्वा' या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वात पदार्पण केलं आहे. या त्याच्या पहिल्याच मालिकेनं 1164 एपिसोड पूर्ण केले होते. त्याची 'सारे तुझ्याचसाठी' ही मालिका प्रचंड गाजली होती. सध्या हर्षद 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेच्या माध्यमातून घरा-घरांत पोहचत आहे. या मालिकेत तो शुभमची भूमिका साकारत आहे. अभिनयाप्रमाणेच हर्षद त्याच्या लुककडेही विशेष लक्ष देत असतो. सोशल मीडियावरदेखील तो अॅक्टिव्ह आहे.
संबंधित बातम्या
Celebrity Diary : 'मैत्री' हा शब्द ऐकल्यावर प्रार्थना बेहेरेला आठवतो 'हा' व्यक्ती; आवडता खाद्यपदार्थ कोणता आहे जाणून घ्या...
Celebrity Diary : पूजा सावंतच्या मोबाईल गॅलरीतला शेवटचा स्क्रिनशॉट ते पुढचं काम तिला कोणासोबत करायचंय जाणून घ्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)