एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार, माफीची मागणी
पत्रकार परिषदेत कंगनाने एका पत्रकारासोबत जोरदार भांडण केलं होतं. पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी नाव सांगताच ती त्याच्यावर भडकली आणि आरोप करायला लागली.
मुंबई : एन्टरटेन्मेंट जर्नलिस्ट गिल्डने अभिनेत्री कंगना राणावतवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच तिने सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी गिल्डने केली आहे. गिल्डच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जजमेंटल है क्या या चित्रपटाची निर्माती एकता कपूरसोबत बैठक करुन याची माहिती दिली. 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री कंगना राणावतने एका पत्रकाराशी अपमानास्पद वर्तणूक केली होती. त्यानंतर एन्टरटेन्मेंट जर्नलिस्ट गिल्डने हा निर्णय घेतला आहे.
बैठकीला उपस्थित पत्रकारांनी म्हटलं की, "गिल्डच्या सदस्यांनी एकता कपूर आणि कंगना राणावतने सार्वजनिकरित्या माफी मागण्यास सांगितलं. निर्माती एकता कपूरने माफीनामा जाहीर करुन सहमती दर्शवली आणि रविवारी घडलेल्या घटनेवर शोक व्यक्त केला."
"आम्ही एका गिल्डच्या स्वरुपात एकत्र येऊन कंगनावर बहिष्कार टाकण्याचा आणि मीडिया कव्हरेज न देण्याचा निर्णय घेतला आहे. या बहिष्काराचा चित्रपट आणि उर्वरित टीमवर कोणताही परिणाम होणार नाही. जोपर्यंत कंगना रविवारच्या घटनेसाठी माफी मागत नाही, तोपर्यंत भविष्यात तिच्या कार्यक्रमांवर बहिष्कार कायम राहिल," असं शिष्टमंडळाने एकता कपूरला लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या प्रमोशननंतरच्या पत्रकार परिषदेत कंगनाने एका पत्रकारासोबत जोरदार भांडण केलं. पत्रकाराने प्रश्न विचारण्यासाठी नाव सांगताच ती त्याच्यावर भडकली आणि आरोप करायला लागली. पत्रकाराने मणिकर्णिका सिनेमाच्या वेळी आपल्याबद्दल खोटंनाटं लिहिलं होतं, असं कंगनाने म्हटलं होतं. मात्र कंगनाने केलेले सर्व आरोप पत्रकाराने फेटाळले.
संबंधित बातम्या
VIDEO | भर पत्रकार परिषदेत कंगनाचं पत्रकारासोबत भांडण
तापसी म्हणजे कंगनाची 'सस्ती कॉपी', कंगनाच्या बहिणीचा थयथयाट
सिनेमाच्या शीर्षकाचा वाद, कंगनाचा संताप, म्हणाली सलमानच्या सिनेमाचे नाव 'मेंटल' असलेलं चालतं...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement