(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Emraan Hashmi injured : इमरान हाश्मीला गंभीर दुखापत, सेटवर झाला अपघात; पण...
Emraan Hashmi injured : अभिनेता इमरान हाश्मीला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. Emraan Hashmi injures
Emraan Hashmi injured : अभिनेता इमरान हाश्मीच्या (Emraan Hashmi) संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. हैदराबादमध्ये गोदाचारी 2 सिनेमाचं शुटींग करत असताना इमरानला गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती आहे. यामुळे इमरानच्या गळ्याला दुखापत झाली आहे. एक अॅक्शन सीन करताना इमरानचा हा अपघात झालाय. पण इमराने स्वत:च स्वत: ला ही दुखापत करुन घेतली असल्याचंही म्हटलं जातंय.
इमरान हाश्मी हा सध्या गोदाचारी सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमात बरेच अॅक्शन सीन्स आहेत. असाच एक अॅक्शन सीन करताना इमरानला ही दुखापत झाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सिनेमाच्या प्रोडक्शन हाऊसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमरान सिनेमातील एका अॅक्शन सीन शूट करत होता. जंपिग सीक्वेन्सदरम्यान त्याने स्वत:च त्याच्या मानेला दुखापत करुन घेतली असावी...
View this post on Instagram
इम्रान हाशमीचे फिल्मी करिअर...
इम्रान हाशमीने 2002 मध्ये 'फूटपाथ' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. परंतु त्याला 'मर्डर' (2004) या चित्रपटातून लोकप्रियता मिळाली. यानंतर इम्रान हाशमीने 'मर्डर 2', 'जन्नत', 'आशिक बनाया आपने', 'राज 3', 'आवारापन', 'हमारी अधुरी कहानी', 'जेहर', 'जन्नत 2', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' 'टायगर 3' आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ओटीटीवर त्याने दोन वेब सीरिजमध्येही काम केले आहे.
ही बातमी वाचा :