Emergency चित्रपटात श्रेयस तळपदे साकारणार 'अटल बिहारी वाजपेयी' यांची भूमिका; अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज
इमर्जन्सी (Emergency) या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात तो अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारत आहे.
Emergency : अभिनेत्री कंगना रनौतच्या (Kangana Ranaut) इमर्जन्सी (Emergency) या बहुचर्चित चित्रपटाची वाट प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. या चित्रपटामध्ये कंगना ही इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. तर काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा लूक रिलीज करण्यात आला होता. अनुपम हे या चित्रपटात जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारत आहेत. आता या चित्रपटामधील श्रेयस तळपदेचा (Shreyas Talpade) लूक रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात तो अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची भूमिका साकारत आहे.
श्रेयसची पोस्ट
श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याचा इमर्जन्सी चित्रपटामधील लूक दिसत आहे. या 'दूरदर्शी, खरे देशभक्त आणि जनसामान्यांचा माणूस अशी ओळख असणाऱ्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयीजी यांची भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. या गोष्टीचा मला आनंद आणि अभिमान वाटत आहे. मला आशा आहे की मी लोकांची अपेक्षा पूर्ण करेन. '
पुढे श्रेयसनं कंगनाबाबत पोस्टमध्ये लिहिलं,'मला ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल मी कंगनाचे आभार मानतो. तू आपल्या देशातील टॅलेंटेड अभिनेत्री आहेस. तसेच तू एक चांगली दिग्दर्शिका देखील आहेस.' पोस्टमध्ये श्रेयसनं अटल बिहारी वाजपेयी यांची एक कविता देखील लिहिली आहे. श्रेयसच्या या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.
पाहा श्रेयसची पोस्ट:
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी कंगनानं Emergency चित्रपटाचा टीझर सोशल मीडिया अकाऊंवर शेअर केला होता. या टीझरनं अनेकांचे लक्ष वेधले. हा टीझर शेअर करुन तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'Presenting ‘Her’who was called ‘Sir’ इमर्जन्सीच्या शूटिंगला सुरुवात' टीझरच्या सुरुवातीला वॉशिंग्टन डी. सी 1971 असं लिहिलेलं दिसत आहे. इमर्जन्सी चित्रपटाचे दिग्दर्शन, कथा लेखन आणि निर्मिती देखील कंगनानं केलं आहे. चित्रपटाचा स्क्रिनप्ले आणि संवाद लेखन हे रितेश शाह यांनी केलं आहे. कंगनाच्या चाहत्यांनी या टीझरला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा: