![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Dunki Trailer : कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणतंय, 'सिनेमॅटिक मास्टरपीस'; किंग खानच्या 'डंकी' चा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन
Shah Rukh Khan Movie Dunki Trailer : अनेक नेटकऱ्यांनी डंकी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.
![Dunki Trailer : कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणतंय, 'सिनेमॅटिक मास्टरपीस'; किंग खानच्या 'डंकी' चा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन Dunki Trailer Twitter reactions people praising shah rukh khan and rajkumar hirani film Trailer Dunki Trailer : कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणतंय, 'सिनेमॅटिक मास्टरपीस'; किंग खानच्या 'डंकी' चा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/05/50f91a0320798bc5049bcbe14d37dac41701763172927259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shah Rukh Khan Movie Dunki Trailer : अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunki) या चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. ट्रेलरमध्ये ड्रामा, इमोशन्स आणि अॅक्शन दिसत आहे. अनेक नेटकऱ्यांनी डंकी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ट्रेलरचं कौतुक केलं आहे.
नेटकऱ्यांनी दिली अशी रिअॅक्शन (Dunki Trailer Twitter Reactions)
अनेक नेटकऱ्यांनी ट्विटरवर डंकी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू शेअर केला आहे. एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, "राजकुमार हिरानी प्रेक्षकांना कधीही निराश करत नाहीत." तर दुसऱ्या युझरनं ट्वीटमध्ये लिहिलं, "शाहरुखचा आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट येतो. डंकी हा शाहरुखचा या वर्षाचा तिसरा ब्लॉकबस्टर ठरेल"
Rajkumar hirani never dissapoints. When king of content meets king of bollywood. @iamsrk #DunkiTrailer pic.twitter.com/PBBZxggqaD
— Daanish (@Daanishdhawan) December 5, 2023
EK SAAL ME 3RD TIME ALL TIME BLOCKBUSTER LOADING 🔥 #DunkiTrailer pic.twitter.com/RcVwK7JfVd
— Javed (Fan) (@JoySRKian_2) December 5, 2023
"डंकी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर मी निश्चितपणे म्हणू शकतो की हा सिनेमा एक उत्कृष्ट 'सिनेमॅटिक मास्टरपीस' असणार आहे. ज्यामुळे लोक हा सिनेमा वर्षानुवर्षे लक्षात ठेवतील!", असं ट्वीट देखील एका नेटकऱ्यानं केलं आहे.
after watching this #DunkiTrailer trailer I can definitely say that is is going to be cinematic masterpiece which people gonna remember this movie for years!!
— Awes Khan (@AwesKha33887819) December 5, 2023
10/10 Trailer hai boys 💯 #DunkiDrop4 pic.twitter.com/Ei3i3MfDtf
वर्षाचा शेवट मनोरंजनाने (Dunki Release Date)
शाहरुखच्या चाहत्यांच्या वर्षाचा शेवट मनोरंजनाने होणार आहे. कारण डंकी हा चित्रपट 21 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात डंकी या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त की कौशल, तापसी पन्नू, बोमन इराणी आणि विक्रम कोचर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. राजकुमार हिरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. डंकी या चित्रपटाची निर्मिती JIO स्टुडिओ, रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि राजकुमार हिरानी फिल्म्स यांनी केली आहे.
डंकी या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. राजकुमार हिरानी यांनी 'संजू', 'पीके', '3 इडियट्स' आणि 'मुन्ना भाई सीरिज' सारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केलं आहे. आता शाहरुख आणि राजकुमार हिरानी यांच्या डंकी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळते का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या:
Dunki Trailer Out : शाहरुखच्या 'डंकी'चा धमाकेदार ट्रेलर आऊट! चाहत्यांना आता सिनेमाची प्रतीक्षा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)