Drishyam 2 : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'दृश्यम 2' ओटीटीवर होणार रिलीज! जाणून घ्या कोणी विकत घेतले डिजिटल राइट्स...
Drishyam 2 : अजय देवगणचा 'दृश्यम 2' हा सिनेमा सिनेमागृहात धुमाकूळ घालत असून लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Drishyam 2 : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा (Ajay Devgn) 'दृश्यम 2' (Drishyam 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे.
'दृश्यम'चा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने चाहते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. 'दृश्यम 2'चं पोस्टर आऊट झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता होती. आता या सिनेमाचा दुसरा भागदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. तसेच काही प्रेक्षकांना हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहण्याची उत्सुकता आहे.
'दृश्यम 2' ओटीटीवर कधी येणार?
'दृश्यम 2' हा सिनेमा सध्या सिनेमागृहात गाजत आहे. आता या सिनेमाचे डिजिटल राइट्स अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने विकत घेतले आहेत. त्यामुळे आता प्राइम व्हिडीओवर प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहता येणार आहे. 18 नोव्हेंबरला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता रिलीजच्या सहा आठवड्यांनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रेक्षक हा सिनेमा ओटीटीवर पाहू शकतात.
'दृश्यम 2' या सिनेमाचं कथानक काय?
'दृश्यम 2'मध्ये विजय साळगावकर म्हणजेच अजय देवगण एका थिएटरचा मालक असलेलं दाखवण्यात आलं आहे. सिनेमांसाठी तो वेडा असल्याचे दिसते आहे. त्यामुळेच तो एका लेखकाची भेट घेतो. पण त्याच्या कथेवर तो समाधानी नसतो त्यामुळे पुन्हा कथानकावर काम करायला सुरुवात करतो. तर दुसरीकडे त्याचे कुटुंबीय सात वर्षांपूर्वी घडलेली घटना विसरलेले नाहीत. त्यामुळे आता पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमा पाहावा लागेल.
'दृश्यम 2'ची कमाई जाणून घ्या...
'दृश्यम 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. या सिनेमाने आतापर्यंत 61.97 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाने 15.36 कोटींची कमाई केली होती. रिलीजच्या पाच दिवसांच्या आत या सिनेमाने 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा सिनेमा 100 कोटींचा टप्पादेखील पार पडेल. 50 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती.
संबंधित बातम्या