एक्स्प्लोर
बॉक्स ऑफिसवर 'ड्रीम गर्ल'चं धुमशान; राझी, उरीसह अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले
'ड्रीम गर्ल'ने 'उरी', 'राझी' यांसारख्या अनेक मोठ्या सिनेमांचे विक्रम मोडले आहेत. समीक्षकांचे चांगले रिव्ह्यू आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे.
![बॉक्स ऑफिसवर 'ड्रीम गर्ल'चं धुमशान; राझी, उरीसह अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले Dream Girl box office collection day 3, collects Rs 44.57 crore in opening week बॉक्स ऑफिसवर 'ड्रीम गर्ल'चं धुमशान; राझी, उरीसह अनेक चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/16135812/Dream-Girl.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dream Girl Box Office Collection : आयुष्मान खुरानाच्या 'ड्रीम गर्ल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमशान घातलं आहे. या सिनेमाने तीन दिवसात एवढी कमाई केली आहे की अनेक मोठ्या चित्रपटांचे विक्रम मोडित निघाले आहे. समीक्षकांचे चांगले रिव्ह्यू आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळे सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे.
मार्केट अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे जारी केले आहे. या सिनेमाने पहिल्या आठवड्यात म्हणजेच सुरुवातीच्या तीन दिवसात कमाईचा 44 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 10.05 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. दुसऱ्या दिवशी 16.42 कोटी आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 18.10 कोटी रुपये कमावले. अशाप्रकारे भारतीय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाची कमाई 44.57 कोटींवर पोहोचली.
या कमाईसह ड्रीम गर्लने 'उरी', 'राझी' यांसारख्या अनेक मोठ्या सिनेमांचे विक्रम मोडले आहेत. आलिया भटच्या 'राझी'ने तीन दिवसात 32.94 कोटी रुपयांची कमाई केली होती. 'स्त्री' चित्रपटाने 32.27 कोटी रुपये कमावले होते. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक'ने तीन दिवसात 35.73 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटात आयुष्मानसोबत नुशरत भरुचा, अन्नू कपूर आणि विजय राज यांसारखे नावाजलेले कलाकार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
करमणूक
करमणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)