एक्स्प्लोर
'लग्नाला सातच महिने, डिम्पी तुला बाळ कसं झालं?'
मुंबई : राहुल महाजनची घटस्फोटित पत्नी, बिग बॉस फेम टीव्हीस्टार डिम्पी गांगुलीने काही दिवसांपूर्वी एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र लग्नाच्या सात महिन्यातच बाळाला जन्म कसा दिलास, असं म्हणत सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या आनंदात मिठाचा खडा टाकला आहे.
डिम्पी गेल्या वर्षी 27 नोव्हेंबरला बिझनेसमन रोहित रॉयसोबत दुबईत विवाहबंधनात अडकली होती. गेल्या आठवड्यात तिने एका मुलीला जन्म दिला असून तिचं नाव 'रिहाना' (Reanna) असं ठेवलं आहे. इन्स्टाग्रामवर तिने फोटो शेअर करत तिने ही बातमी सांगितली आहे.
यावर कमेंट करताना मुन्नी नावाच्या एका युझरने 'डिम्पी, तुझ्या लग्नाला जेमतेम साडेसहा महिनेच होत आहेत. तुझं बेबी बम्प पाहता नऊ महिने भरल्याचं दिसत होतं. मग तू लग्नाआधीच प्रेग्नंट होतीस का?' अशी खोचक कमेंट केली आहे.
डिम्पी गांगुलीच्या घरी नन्ही परी
डिम्पीचा पती रोहितने मात्र या यूझरचा चांगलाच समाचार घेतला आहे. 'तुझी बडबड बंद कर. वाचाळ कुत्रे भुंकत असूनही बायकोच्या रक्षणाला न येणाऱ्या पुरुषांच्या समाजात तू राहत असशील. पण माझ्या सुदैवाने आपल्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीर उभं राहणाऱ्यांच्या समाजात मी वावरतो. त्यामुळे या प्रकरणात नाक खुपसणारा मी कोण, असा प्रश्न तुझ्या मनात आला असेल, तर तुला आठवण करुन देतो की जिच्यावर तू चिखलफेक करत्येस ती डिम्पी माझी बायको आणि माझ्या बाळाची आई आहे.' मुन्नी नावाच्या इन्स्टाग्राम युझरलाच उत्तर देताना रोहित पुढे म्हणतो 'लग्न हे पैसा आणि प्रसिद्धीसाठी केलं जातं, हा तुझा समज तुझ्या अनुभवात येत असेलही, पण म्हणून सगळेच असे वागतात, असं गरजेचं नाही. एक ना एक दिवस तू किती हीन पातळीचं बोललीस हे तुला कळावं अशी माझी इच्छा आहे. तुझे अभद्र विचार तुझ्या कुटुंबीयांना समजले, तर त्यांनाही तुझा अभिमान वाटेल, असं मला वाटत नाही. तुझ्या इंग्रजीइतकेच तुझे विचार, तुझी मतं आणि तुझे ठोकताळे चुकीचे आहेत. तुझ्याकडून अपेक्षाच नाही. लॉल' असं सडेतोड उत्तर रोहितने दिलं आहे. राहुल महाजन आणि डिम्पी 'राहुल दुल्हनिया ले जाएंगे' या कार्यक्रमानंतर विवाहबंधनात अडकले होते, मात्र सारं काही आलबेल न झाल्यामुळे ते विभक्त झाले. त्यानंतर डिम्पीने रोहितसोबत लग्नगाठ बांधली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement