एक्स्प्लोर

Digpal Lanjekar: दिग्पाल लांजेकरांनी चित्रपटाचा विषय बदलला? 'सुभेदार' च्या घोषणेनंतर चाहत्यांचा प्रश्न

नुकतीच दिग्पाल यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव 'सुभेदार' (Subhedar) असं आहे.

Digpal Lanjekar:  प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांच्या चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. त्यांच्या शेर शिवराज, पावनखिंड, सरसेनापती हंबीरराव, फर्जंद आणि फत्तेशिकस्त या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. नुकतीच दिग्पाल यांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव 'सुभेदार' (Subhedar) असं आहे. दिग्पाल यांनी सोशल मीडियावर सुभेदार या चित्रपटाचं पोस्टर शेअर करुन त्यांच्या या नव्या चित्रपटाची घोषणा केली. या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले. पण दिग्पाल यांच्या या चित्रपटाचं पोस्टर पाहून अनेक नेटकऱ्यांना सध्या काही प्रश्न पडत आहेत. 

नेटकऱ्यांना पडले प्रश्न
दिग्पाल यांच्या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'शेर शिवराज, स्वारी आग्रा येणार होता त्याच काय झालं ?' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'सर, स्वारी आग्रा पुढे ढकलला का?' 

दिग्पाल यांच्या पुढील चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्रा सुटकेचा थरार दाखवण्यात येईल, असं म्हटलं जात होतं. पण सुभेदार या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर दिग्पाल यांनी त्याच्या चित्रपटाचा विषय बदलला का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. 

एका नेटकऱ्यानं कमेंट करुन दिग्पाल यांचं कौतुक केलं आहे. त्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'आग्रा भेटीवर डॉ. कोल्हे यांचा एक सिनेमा येऊन गेलाय त्यामुळे तुमचा हा निर्णय योग्य आहे.. हिंदी तानाजी चित्रपट इतिहासाला धरून नव्हता त्यामुळे या चित्रपटाकडून अपार आशा आहे...'

View this post on Instagram
 
A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)

दिग्पाल लांजेकरच्या संकल्पनेतील 'शिवराज अष्टक' या शिवचरित्रावरील चित्रपट श्रुखंलेला तमाम शिवभक्त आणि रसिकांमध्ये खूपच लोकप्रियता मिळाली. त्यामुळे दिग्पालच्या आगामी चित्रपटात काय पहायला मिळणार? याबाबत सर्वांनाच कुतूहल होतं. नुकतीच ‘सुभेदार’ या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. ‘काळावर नाव कोरणाऱ्या महावीराची महागाथा... 'सुभेदार' अशी या चित्रपटाची अतिशय समर्पक टॅगलाईन आहे. 'सुभेदार' या शीर्षकावरून हा चित्रपट सुभेदार तान्हाजी मालुसरेंची शौर्यगाथा सांगणारा असल्याचं समजतं. त्यानुसार या चित्रपटात तान्हाजी मालुसरे आणि त्यांनी राखलेल्या सिंहगडाची थरारक कथा पहायला मिळणार आहे. पोटच्या मुलाचं लग्न बाजूला सारून किल्ले कोंढाण्याच्या शिखरावर स्वराज्याचं विजयी तोरण बांधण्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका बलाढ्य योद्ध्याचा रोमहर्षक पराक्रम 'सुभेदार'मध्ये अनुभवायला मिळेल. 

ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या 'सुभेदार' चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर करणार आहेत. प्रद्योत प्रशांत पेंढरकर, अनिल नारायण वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे, विनोद निशिद जावळकर, शिवभक्त अनिकेत निशिद जावळकर, श्रुती दौंड या चित्रपटाचे निर्माते आहेत. जून 2023 मध्ये 'सुभेदार' चित्रपट रसिक दरबारी सादर होणार आहे.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 

Sher Shivraj : अफजलखानाच्या वधाचा थरार आता घरबसल्या अनुभवा; 'शेर शिवराज'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सAnna Bansode Vidhansabha Deputy Speaker: अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी,प्रस्ताव एकमताने समंतNagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटकDhananjay Deshmukh Meet Ujjwal Nikam : संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी, धनंजय देशमुख उज्वल निकमांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Santosh Deshmukh Case & Walmik Karad: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी उज्ज्वल निकमांचा पहिला युक्तिवाद, विष्णू चाटेचं नाव घेत म्हणाले...
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी उज्ज्वल निकमांचा पहिला युक्तिवाद, विष्णू चाटेचं नाव घेत म्हणाले...
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये हिरोईन म्हणून धुमाकूळ घालणारी हंसिका मोटवानीचा ग्लॅम लूक; पाहाचं!
Embed widget