Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा
Hema Malini : हेमा मालिनी आणि धर्मेंद्रची आई सतवंद कौर यांची पहिली भेट खूपच यादगार आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
![Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा Dharmendra Mother First Reaction After Meeting Pregnant Hema Malini for the first time Know Bollywood Entertainment Latest Update Marathi News Hema Malini : प्रेग्नंट हेमा मालिनीला पहिल्यांदा भेटल्यानंतर धर्मेंद्रच्या आईची 'अशी' होती प्रतिक्रिया; 'ड्रीम गर्ल'ने सांगितला किस्सा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/13/462d1023598ec9fcb7ba3630af007f211715563840203254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Hema Malini : 'ड्रीम गर्ल' हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या सौंदर्याचा मोठा चाहतावर्ग आहे. लग्न झालेले धर्मेंद्रही (Dharmendra) हेमा मालिनी यांच्या प्रेमात वेडे झाले होते. एकदा लग्न झालेलं असतानाही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्रसोबत लग्न केल्यानंतर त्यांच्या पत्नीपासून त्यांनी सम्मानजनक अंतर ठेवण्याचा निर्णय घेतला. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची आई सतवंत कौर यांच्यासोबतची पहिली भेट खूपच यादगार आहे. हेमा मालिनी यांनी आपल्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर आणि दुसरी पत्नी हेमा मालिनी यांच्या नात्याबद्दल अनेकदा भाष्य केलं जातं. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या लग्नाला 40 वर्षे झाली आहेत. हेमा मालिनी आधी धर्मेंद्र यांनी प्रकाश कौरसोबत लग्न केलं होतं. 1980 मध्ये हेमा मालिनीसोबत लग्न केल्याने धर्मेंद्र चर्चेत आले होते.
हेमा मालिनींची सासूसोबतची पहिली भेट कशी होती?
हेमा मालिनी यांनी 'हेमा मालिनी: बियोंड द ड्रीम गर्ल' ही बायोग्राफी लिहिली आहे. यात त्यांनी सासू सतवंद कौर यांच्या पहिल्या भेटीदरम्यान खूप नर्वस असल्याचं म्हटलं आहे. तसेच सासू पहिल्यांदा भेटणार असल्याने त्यांना भेटण्यासाठी त्या उत्सुक होत्या. हेमा मालिनी म्हणतात,"धर्मेंद्र यांची आईदेखील खूप दयाळू आहे. मी पहिल्यांदा प्रेग्नंट असताना धर्मेंद्रची आई मला भेटायला जुहू येथील डबिंग स्टुडिओमध्ये आली होती. त्यावेळी त्या मला म्हणालेल्या,"बाळा कायम आनंदी राहा. मला भेटल्यानंतर सासूबाईंना नेहमीच आनंद व्हायचा".
प्रकाश कौर यांचा आदर करते : हेमा मालिनी
हेमा मालिनी यांनी आपल्या पुस्तकात धर्मेंद्र यांची पहली पत्नी प्रकाश कौर यांचादेखील उल्लेख केला आहे. प्रकार कौर आणि त्यांच्या मुलांचा आदर करत असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. हेमा मालिनी आपल्या पुस्तकात म्हणाल्या,"मी कधीही प्रकाशबद्दल भाष्य केलेलं नाही. पण मी कायमच त्यांचा आदर करते. माझ्या मुलीदेखील धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांचा आदर करतात. जगाला माझ्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे".
हेमा मालिनी आणि प्रकाश कौर एकमेकांपासून दूर राहणं पसंत करतात. धर्मेंद्रसोबत लग्न करण्याआधी हेमा मालिनी प्रकाश कौर यांना भेटलेली आहे. कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत हेमा मालिनी आणि प्रकाश कौर यांची भेट झालेली आहे. पण धर्मेंद्रसोबत लग्न झाल्यानंतर प्रकाश कौर आणि हेमा मालिनी यांची भेट झाली नाही.
संबंधित बातम्या
Dharmendra Marriage : धर्मेंद्र तिसऱ्यांदा अडकले विवाह बंधनात? वरमालासह पत्नीचा फोटो आला समोर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)