(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhool Bhulaiyaa 2 Box Office Collection: कार्तिकचा ‘भूल भुलैया 2’ प्रेक्षकांना आवडला! दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली चित्रपटाची जादू!
Bhool Bhulaiyaa 2 : पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची जादू दिसते आहे.
Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉलिवूडचा सर्वात मोठी ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाची जादू दिसते आहे. शुक्रवारच्या अधिकृत आकडेवारीनुसार, 'भूल भुलैया 2' चित्रपटाने 14.11 कोटींचा व्यवसाय केला.
पहिल्या दिवसाची ही कमाई या वर्षात आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटांमधील सर्वाधिक कमाई ठरली आहे. इतकेच नाही तर, कार्तिक आर्यनच्या कारकिर्दीतील ही सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. अशाप्रकारे कार्तिकने बॉक्स ऑफिसवर एवढी मोठी कमाई करून बॉलिवूड चित्रपटांना चांगलीच टक्कर दिली आहे. आता असे दिसते आहे की, 'भूल भुलैया 2' या वीकेंडपर्यंत 50 कोटींचा टप्पा पार करेल. प्राथमिक आकडेवारीनुसार, कार्तिक आर्यनच्या चित्रपटाने शनिवारी म्हणजेच दुसऱ्या दिवशी 16 ते 17 कोटींचा व्यवसाय केला आहे.
‘भूल भुलैया 2’ची जादू!
'भूल भुलैया 2'ने शनिवारीही आपला परफॉर्मन्स कायम ठेवला आहे. पहिल्या दिवसाच्या 14.11 च्या कमाईमध्ये शनिवारच्या कलेक्शनचीही भर पडली, तर 31 कोटींहून अधिकचा आकडा तयार होतो आहे. रविवारी चित्रपटाचे कलेक्शन 20 कोटींच्या वर जाण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार दिग्दर्शक अनीस बज्मीचा चित्रपट 'भूल भुलैया 2' पहिल्या वीकेंडमध्येच 50 कोटींचा टप्पा पार करेल, असे म्हटले जात आहे.
'धाकड' पडला फिका!
कंगनाच्या 'धाकड' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण, दुसरीकडे प्रेक्षकांना 'भूल भुलैया 2' ची क्रेझ होती. त्यामुळे प्रेक्षकांनी रिलीजच्या पहिल्या दिवशी 'भूल भुलैया 2'ला पसंती दर्शवली. 'भूल भुलैया 2'ने रिलीजच्या पहिल्या दिवशी 14.11 कोटींची कमाई केली आहे. तर, दुसरीकडे कंगनाच्या 'धाकड' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी खूपच कमी कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त एक कोटींचा गल्ला जमवला आहे. 'धाकड' हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई यांनी केलं आहे. या चित्रपटात कंगना रनौत, अर्जुन रामपाल आणि दिव्या दत्ता मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या