एक्स्प्लोर

'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं

'देशात लग्न केलं तर त्याचा तमाशा होईल. पापाराझ्झी म्हणजेच फोटोग्राफर्सचा ससेमिरा चुकवता-चुकवता तुमच्या नाकी नऊ येतील' असं आदित्य चोप्रांनी अनुष्काला सांगितलं.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा लग्नसोहळा इटलीत पार पडला. इटलीतील मिलानपासून 34 किलोमीटर दूर सिएनामधील Borgo Finocchieto रिसॉर्टमध्ये त्यांच्या लग्नाचे विधी पार पडले. मात्र दोघांना भारतातील गजबजाटापासून दूर लग्न करण्याचा सल्ला कोणी दिला, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. बॉलिवूडची प्रथितयश अभिनेत्री राणी मुखर्जी आणि यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रा या सेलिब्रेटी कपलने विरानुष्काला हा सल्ला दिल्याची माहिती आहे. 'एशियन एज'मधील रिपोर्टनुसार आदित्य चोप्राने अनुष्काला इटलीतील हे स्थळ सुचवलं. एप्रिल 2014 मध्ये आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जीही अशाचप्रकारे इटलीतील रिसॉर्टमध्ये विवाहबंधनात अडकले. या लग्नाची कुणकुणही फार कमी जणांना लागली होती. बॉलिवूडमधील करण जोहर सारखे मोजके सेलिब्रेटी वगळता राणीच्या लग्नाला फार कोणी उपस्थित नव्हतं. 22 एप्रिल 2014 रोजी तिने एका स्टेटमेंटमधून लग्नाची घोषणा केली. विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं 'देशात लग्न केलं तर त्याचा तमाशा होईल. पापाराझ्झी म्हणजेच फोटोग्राफर्सचा ससेमिरा चुकवता-चुकवता तुमच्या नाकी नऊ येतील' असं आदित्य चोप्रांनी अनुष्काला सांगितलं. अनुष्काने 2008 मध्ये यशराज फिल्म्सच्या 'रब ने बना दी जोडी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, त्यानंतर 'बँड, बाजा, बारात' 'जब तक है जान' सारख्या चित्रपटातही ती झळकली. त्यामुळे अनुष्कासाठी चोप्रा कुटुंब गुरुस्थानी आहे. कसं आहे Borgo Finocchieto रिसॉर्ट? विराट आणि अनुष्काचं लग्न इटलीतील Borgo Finocchieto रिसॉर्टमध्ये पार पडलं. हे रिसॉर्ट प्रचंड महागडं आणि ऐतिहासिक आहे. हे रिसॉर्ट तब्बल 800 वर्ष जुनं आहे. Tuscany च्या सुंदर डोंगररांगांमध्ये बनवण्यात आलेलं हे रिसॉर्ट एअरपोर्टपासून अवघ्या 1 तासाच्या अंतरावर आहे. या रिसॉर्टमध्ये केवळ 5 सुट्स, 5 व्हिला आणि फक्त 22 खोल्या आहेत. त्यामध्ये जवळपास 44 जणच राहू शकतात. याशिवाय स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट आणि स्पा सारख्या गोष्टीही इथे उपलब्ध आहेत. फोर्ब्सच्या ताज्या रिपोर्टनुसार, हे रिसॉर्ट जगातील दुसरं महागडं हॉलिडे डेस्टिनेशन आहे. एका दिवसासाठी इथे तब्बल 15,000 डॉलर (अंदाजे दहा लाख रुपये) मोजावे लागतात. येथील खास वातावरणामुळे डिसेंबरमध्ये या ठिकाणाला बरेच पर्यटक पसंती देतात. याच वर्षी मे महिन्यात अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आपल्या पत्नीसोबत गेले होते. विराट आणि अनुष्का हनिमूनसाठी रोमला जाणार आहेत. त्यानंतर 21 डिसेंबरला रिसेप्शन असल्यामुळे ते त्यापूर्वी भारतात परततील. त्यानंतर मुंबई आणि दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन पार्टी होणार आहे. VIDEO :

संबंधित बातम्या :

VIDEO : 'विरानुष्का'चं लग्न झालेलं 'हेच' ते खास ठिकाणं!

विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा अखेर विवाहबंधनात! विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!

पाकिस्तानी किक्रेटर्सकडूनही 'विरानुष्का'ला लग्नाच्या शुभेच्छा

विराटनं अनुष्काला दिलेल्या अंगठीची नेमकी किंमत किती?

विराटला प्रपोज करणाऱ्या तरुणीच्या 'विरानुष्का'ला एका शब्दात शुभेच्छा!

दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन

रब ने बना दी जोडी... 'विरानुष्का'ची लव्हस्टोरी क्रिकेट आणि बॉलिवूडमधल्या नात्याची परंपरा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM : 27 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Katta : लग्नापासून,राजकीय पक्षांना हेलिकॉप्टर्स पुरवणारे उद्योजक Mandar Bhardeमाझा कट्ट्यावरMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 April 2024Zero Hour Baramati:Sunetra Pawar यांचा प्रचार कसा सुरू आहे?बारामतीकर कुणाला निवडून देणार?Ground Zero

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
Richest Indian Youtuber : सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं राजस्थानसमोर 197 धावांचे आव्हान
राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं राजस्थानसमोर 197 धावांचे आव्हान
Embed widget