एक्स्प्लोर
ब्राझीलचा फुटबॉलर नेमार आणि दीपिकाचं कनेक्शन काय?
मुंबई : ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमार आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण यांचा काय कनेक्शन असू शकतं? फार विचार करु नका, कारण या दोघांमध्ये काही सुरु नाही. ज्या सिनेमातून दीपिका हॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे, त्या 'ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज'मध्ये नेमारही दिसणार आहे.
दीपिकाच्या या हॉलिवूड सिनेमात नेमारची छोटा मात्र महत्त्वपूर्ण भूमिका आहे. चित्रपटात नेमारचा कॅमियो आहे. विशेष म्हणजे दीपिका नेमारसोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल.
दीपिका पदुकोनचा खऱ्याखुऱ्या बंदुकीसह क्लायमॅक्स सीन
'ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज'चं शूटिंग संपवून नुकतीच भारतात परतली आहे. या सिनेमात दीपिकासोबत विन डिजल दिसणार आहे. जगातील बेस्ट स्ट्रायकर म्हणून नेमारची ओळख आहे. आता अभिनयाच्या पीचवरही त्याने कौशल्य दाखवण्याचा विचार केला.विन डीजलसोबत दीपिका पदुकोणचा पहिला व्हिडिओ
सेटवर नेमारला पाहून सर्वच जण एक्साईट झाले होते. विन डिझेल आणि दीपिका नेमारसह अनेक दृश्यांमध्ये दिसणार आहे. 'ट्रिपल एक्स : द रिटर्न ऑफ झँडर केज' अजूनही पोस्ट प्रॉडक्शन स्टेजवर आहे. जानेवारी 2017 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर चित्रपटाचा ट्रेलर 22 जुलैला रिलीज होणार आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement