एक्स्प्लोर
दीपिकाने स्वतःसाठीच खरेदी केलं मंगळसूत्र, किंमत...
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे. दोघांनीही लग्नाची शॉपिंग सुरू केली आहे. हिंदू विवाह सोहळा म्हटलं की त्यामध्ये मंगळसुत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे मंगळसूत्र प्रत्येक महिलेसाठी खूप खास असते. त्यामुळे दीपिकानेदेखील असेच खास मंगळसूत्र खरेदी केले आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा विवाहसोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दोघांच्याही घरी लग्नाची खरेदी जोरदार सुरु आहे. दीपिकाने नुकतीच तिच्या बंगळुरुतील राहत्या घरी नंदी पूजादेखील केली. हिंदू विवाह सोहळा म्हटलं की त्यामध्ये मंगळसूत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे मंगळसूत्र प्रत्येक महिलेसाठी खूप खास असतं. त्यामुळे दीपिकानेही असंच खास मंगळसूत्र खरेदी केले आहे. परंतु दीपिकाच्या मंगळसूत्राची किंमतही भली मोठी आहे. दीपिकाने तब्बल 20 लाख रुपयांचे मंगळसूत्र खरेदी केले आहे. अंधेरी येथील एका दागिन्यांच्या दुकानातून तिने हे मंगळसूत्र खरेदी केले आहे. दीपिका आणि रणवीर 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नापूर्वीचे विधी सुरु झाले आहेत. दीपिकाच्या घरी नंदी पूजा आणि रणवीरच्या घरी सत्यनारायणाची पूजा नुकतीच पार पडली. तसेच दोघांनी लग्नाची शॉपिंगदेखील सुरू केली आहे. दीपिकाने लग्नात परिधान करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपयांचे दागिने खरेदी केले आहेत. शटर बंद करुन शॉपिंग दीपिकाने अंधेरी येथील एका दागिन्यांच्या दुकानात खरेदी केली. यावेळी दागिन्यांचे हे दुकान एका तासासाठी सामान्य ग्राहकांसाठी बंद करण्यात आले होते. तसेच यावेळी दीपिकाने रणवीरसाठी एक चेनही खरेदी केली आहे.
आणखी वाचा























