Deepika Padukone : प्रेग्नंट दीपिका अन् रणवीर सिंह वेकेशनवर; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
Deepika Padukone Unseen Picture : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोणचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये दीपिका बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहेत.
Deepika Padukone Flaunts Her Baby Bump : बॉलिवूडचं स्टार कपल रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या चर्चेत आहेत. दोघे आई-बाबा होण्यासाठी आता सज्ज आहेत. दीपिका पादुकोण सध्या आपली प्रेग्नंसी प्रीरियड एन्जॉय करताना दिसत आहे. दीपिका याच वर्षी आपल्या बाळाचं स्वागत करणार आहे. प्रेग्नंसीनंतर दीपिका पादुकोण मीडिया लाइमलाइटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बेबी बंपदेखील फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. अशातच आता दीपिका पादुकोणचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्री हँडसम पतीसोबत दिसून येत आहे. अभिनेत्रीचा हा फोटो पाहून चाहते आनंदी झाले आहेत.
बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली दीपिका पादुकोण
दीपिका पादुकोणने प्रेग्नंसीमुळे मेट गाल इव्हेंटमध्ये हजेरी लावली नव्हती. दीपिका न दिसल्याने चाहत्यांना तिची आठवण येत आहे. पण दीपिकाने आपल्या लेटेस्ट फोटोने चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. दीपिका पादुकोणचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर जिन्याने खाली उतरताना दिसत आहे.
दीपिकाने या फोटोमध्ये ओव्हर साइज टीशर्ट आणि डेनिम परिधान केलेलं दिसत आहे. अभिनेत्रीचा हा कूल लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. केसांचा बन आणि डोळ्यावर काळा चश्मा तिने घातला आहे. या फोटोमध्ये दीपिकाचे बेबी बंप स्पष्ट दिसून येत आहेत. दीपिकाच्या मागे पांढऱ्या आऊटफिटमध्ये रणवीर सिंह दिसून येत आहे. रणवीरने आपला चेहरा झाकला आहे. जोडप्याच्या या फोटोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दीपिका आणि रणवीरचा हा फोटो नक्की कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. रणवीर-दीपिकाच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
रणवीर-दीपिका 'या' चित्रपटात झळकणार
रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण दोघेही आता 'सिंघम अगेन' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटातील काही पोस्टर दीपिका आणि रणवीरने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या चित्रपटात अजय देवगन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफसह अनेक कलाकार झळकणार आहेत. हे सर्व सेलिब्रिटी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
संबंधित बातम्या