एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बॉक्स ऑफिसवर 'दंगल', तीन दिवसात 100 कोटी क्लबमध्ये प्रवेश
मुंबई : अभिनेता आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाने वीकेंडला मोठी कमाई केली आहे. रविवारी सिनेमाने 42.35 कोटी रुपयांची कमाई करत 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. यासोबत आमीरचा हा 100 कोटींची कमाई करणारा पीकेनंतर पाचवा सिनेमा ठरला आहे.
'दंगल'ने सलमान खानच्या 'सुलतान' सिनेमाचाही विक्रम मोडला आहे. सुलतानने पहिल्या दिवशी 36, दुसऱ्या दिवशी 37 आणि तिसऱ्या दिवशी 31 कोटी मिळून वीकेंडला एकूण 105 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र 'दंगल'ने हा विक्रम मोडित काढला आहे.
शुक्रवारी म्हणजे पहिल्या दिवशी सिनेमाने 29.78 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर शनिवारी 34.82 कोटींचा गल्ला जमवला, रविवारच्या 42.35 कोटींच्या कमाईसह सिनेमाने आतापर्यंत 106.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
या सिनेमाने भारतातच नव्हे तर वर्ल्डवाईड देखील मोठी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारी सिनेमाने वर्ल्डवाईड 28.49 कोटी रुपयांची कमाई केली होती. वर्ल्डवाईड दुसऱ्या दिवशीच्या काही ठराविक ठिकाणच्या कलेक्सननुसार 44.28 कोटींची कमाई केली होती. मात्र एकूण आकडा अजून येणं बाकी आहे.
सिनेमाचं कथानक हरियाणातील पैलवान महावीर सिंह फोगट यांच्या जीवनावर आधारीत आहे. आमीर खाननं महावीर सिंह फोगट यांची भूमिका जीवंत करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. या सिनेमात महावीर सिंह फोगट यांनी आपल्या मुली गीता आणि बबीता यांना कशाप्रकारे कुस्तीचं प्रशिक्षण देत आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू बनवलं.
आमीर खानचे 100 कोटी क्लबमधील सिनेमे
- गजनी - 2008
- 3 इडियट्स - 2009
- धूम 3 - 2013
- पीके - 2014
- दंगल - 2016
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement