'Dance Deewane 3' चा जज धर्मेशला कोरोनाची लागण, माधुरी दीक्षितचा रिपोर्ट निगेटिव्ह
धर्मेश व्यतिरिक्त शोचे जज माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मुंबई : देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाने महाराष्ट्रात अक्षरश: थैमान घातलं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटी देखील आता कोरोनाच्या विळख्यात सापडताना दिसत आहेत. 'डान्स दिवाने 3' शोचा जज धर्मेशचा कोरोना रिपोर्टही पॉाझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत बर्याच सेलिब्रिटी, क्रू मेंबर्स आणि चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच 'डान्स दिवाने 3' च्या सेटवर 18 जणांना कोरोनाची लागण झाली होती. पण सुदैवाने या शोचे कोणतेही जज किंवा स्पर्धक कोरोना पॉझिटिव्ह आढळले नव्हते. मात्र आता शोचा जज धर्मेशचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाची लागण झाल्यानंतर धर्मश होम क्वॉरंटाईन आहे.
‘द बिग बुल’ सिनेमातील अभिषेक बच्चनची हिरोईन निकिता दत्ताला कोरोनाची लागण
माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह
धर्मेश व्यतिरिक्त शोचे जज माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया यांचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. मात्र त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आता माधुरी दीक्षित आणि तुषार कालिया जज म्हणून शोमध्ये उपस्थित राहतील. मात्र धर्मेश यापुढे काही दिवस या कार्यक्रमाचा भाग नसेल. कोरिओग्राफर पुनीत पाठक आणि शक्ती मोहन धर्मेशच्या जागी 'डान्स दिवाना 3' मध्ये भाग घेतील. सोशल मीडियावर पुढील एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये पुनीत पाठक आणि शक्ती मोहन दिसत आहेत.
View this post on Instagram
Katrina Kaif Corona Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा विळखा वाढतोय, अभिनेत्री कतरिना कैफ पॉझिटिव्ह
अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण
गेल्या काही दिवसात कतरिना कैफ, अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक आदित्य नारायण पत्नी श्वेता अगरवाल, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, कॉमेडीयन कुणाल कामरा, शशांक खेतान, मनोज बाजपेयी, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे.