Daisy Irani: 'वयाच्या सहाव्या वर्षी बलात्कार; बेल्टनं बेदम मार खाल्ला'; अभिनेत्रीनं मांडली व्यथा
अभिनेत्री (Actress) डेझी इराणी (Daisy Irani) यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील संकटांबाबत तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत सांगितलं.
Daisy Irani: मोठ्या पडद्यावरील हसतमुख दिसणाऱ्या काही सेलिब्रिटींनी त्यांच्या खऱ्या आयुष्यात अनेक संटकांचा सामान केला आहे. बऱ्याच वेळा विविध मुलाखतींच्या माध्यमातून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी त्यांचे दु:ख चाहत्यांसोबत शेअर करतात. अभिनेत्री (Actress) डेझी इराणी (Daisy Irani) यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आयुष्यातील संकटांबाबत तसेच त्यांच्यासोबत घडलेल्या धक्कादायक घटनेबाबत सांगितलं.
प्रसिद्ध फिल्ममेकर आणि कोरियोग्राफर फराह खानची मावशी डेझी इराणी यांनी 1950 मध्ये बाल कलाकार म्हणून करिअरला सुरुवात केली. डेझी यांनी सांगितले की, त्यांच्यावर वयाच्या सहाव्या व्या वर्षी बलात्कार झाला होता.
एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये डेझी इराणी यांनी सांगितलं की, एका व्यक्तीनं त्यांच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी त्यांचे वय सहा वर्ष होतं. त्या म्हणाल्या, ज्या व्यक्तीने माझ्यावर बलात्कार केला तो माझा गार्डियन होता. तो माझ्यासोबत चेन्नईत 'हम पंछी एक डाल के' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आला होता. एका रात्री त्याने हॉटेलच्या खोलीत माझ्यावर अत्याचार केला. त्याने मला बेल्टने मारहाण केली आणि मी कोणाला काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली. तो व्यक्ती मेली आहे. त्या व्यक्तीचे नाव 'नजर' असं होतं. त्या व्यत्तीची चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसोबत ओळख होती. '
पुढे डेझी इराणी यांनी सांगितलं, 'मी स्टार व्हावे अशी माझ्या आईची इच्छा होती. मी मराठी चित्रपटातून केली डेब्यू केला होता. आजही ती घटना आठवते. त्या गोष्टीचं दु:ख मला आजही होतं. त्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी मी पुन्हा काम करायला लागले. नॉर्मल झाले जणू काही घडलेच नाही. माझ्या आईला या घटनेबाबत सांगायची माझ्यात हिंमत नव्हती.'
'मी 15 वर्षांची होते जेव्हा माझ्या आईला ही बलात्काराची ही घटना कळली. ती माझ्याजवळ आली आणि विचारले की हे सर्व खरे आहे का? जेव्हा मी तिला हो खरे आहे असे सांगितले तेव्हा तिला स्वत:ची लाज वाटली. ती माझी माफी मागू लागली. तो क्षण खूप हृदय पिळवटून टाकणारा होता.', असंही डेझी इराणी यांनी सांगितलं.
बंदिश (1955), एक ही रास्ता (1956), नया दौर (1957) जेलर (1958), कैदी नं. 911 (1959) आणि दो उस्ताद (1959) या चित्रपटांमध्ये डेझी इराणी यांनी काम केलं.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: