Coronavirus | भाईजानची गरजूंना मदत; इंडस्ट्रिमधील 16000 मजूरांच्या खात्यात 4 कोटी 80 लाख रूपये
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. सलमान खानने इंडस्ट्रिशी निगडीत 16000 मजूरांना आर्थिक मदत करणार असल्याचं जाहीर केलं होतं.
मुंबई : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेकांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. अशातच बॉलिवूड आणि सिरियल्सचं शुटिंगही बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे इंडस्ट्रिशी निगडीत 16000 मजूरांना आर्थिक मदत करणार असल्याचं सलमान खानने जाहीर केलं होतं. सांगितल्याप्रमाणे मंगळवारपासून सलमान खानने मजूरांना मदत करण्यास सुरुवात केली आहे.
सलमान खानकडून इंडस्ट्रीशी निगडीत 16000 मजूरांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 3000 रूपये जमा करण्याची सुरुवात केली होती. अशाप्रकारने दो दिवसांमध्ये म्हणजेच, मंगळवार, बुधवारपर्यंत या सर्व मजूरांच्या खात्यामध्ये 4 कोटी 80 लाख रूपये जमा करण्यात येणार आहेत. याबाबत फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE)चे अध्यक्ष अशोक दुबे यांनी एबीपी न्यूजला दिली आहे.
देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 19 मार्च पासूनच बॉलिवूडमध्ये चित्रपटांच्या शुटींग रद्द करण्यात आल्या आहेत. अशातच चित्रपट, टीव्ही सिरीयल्स, जाहिराती आणि वेब सीरिजच्या शुटिंगशी निगडीत मजूरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच इतर बॉलिवूड सेलिब्रिटींव्यतिरिक्त सलमान खाननेही या मजूरांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. अमिताभ बच्चन, शाहरूख खान यांनी मदत करणार असल्याची घोषणा केली होती. दोघांनीही आपल्या ट्वीटमार्फत याबाबत माहिती दिली होती. तर अजय देवगण आणि रोहित शेट्टीने प्रत्येकी 51 लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. यांच्याव्यतिरिक्त इतरही बॉलिवूड सेलिब्रिटी मदतीसाठी समोर आले आहेत. सलमान खानने FWICE मार्फत 25000 मजूरांच्या बँक खात्यांचे नंबर्स मागितले आहे. त्यांना थेट त्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यात येणार आहेत. तसेच बॉलिवूड स्टार अक्षय कुमारने पीएम केअर फंडसाठी 25 कोटी रूपये मदत केली आहे. तर कार्तिक आर्यन आणि विक्की कौशलनेदेखील प्रत्येकी एक कोटी रूपयांची मदत केली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | मनोधैर्य वाढवणारं बॉलिवुडकरांचं 'मुस्कुराएगा इंडिया' गाणं; पंतप्रधानांकडून कौतुक
Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी शाहरूख खान करणार मदत; ट्विटरवरून दिली माहिती
Coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांसाठी खिलाडी अक्षय कुमार सरसावला; पीएम केयर फंडसाठी 25 कोटींची मदत Coronavirus | सारा अली खानसोबतच करिना, सैफनेही केली कोरोनाग्रस्तांसाठी मदत